मुंबई, दि. २३ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी विधान भवनात अभिवादन करण्यात आले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विधानपरिषदेच्या सदस्या आमदार मनीषा कायंदे तसेच विधानसभेचे अध्यक्ष यांचे सचिव सुनिल वाणी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव विजय कोमटवार व विशेष कार्य अधिकारी सोमनाथ सानप यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.