Pune-Nashik Highway Accident: देबूबाई टाकळकर या गेल्या २० वर्षापासून भाजीपाला नारायणगाव येथे विकण्यासाठी जात होत्या. एवढ्या वयात देखील त्या शेतात काम करत असत. संपूर्ण आयुष्य शेतात गेले. मात्र आज त्यांच्या आयुष्याचा प्रवास शेवटचा ठरला. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले आणि दोन मुली असा परिवार असल्याची माहिती समोर आली असून त्यांच्या जाण्याने कुटुंबाचा आधार हरपल्याची भावना कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.
हायलाइट्स:
- भाजीपाला विक्रीच्या २० वर्षांच्या कामाला अखेर पूर्णविराम
- ६५ वर्षीय आजींचा पुण्यातील अपघातात दुर्दैवी मृत्यू
- आज त्यांच्या आयुष्याचा प्रवास शेवटचा ठरला
मयतांची नावे
१. देबुबाई दामू टाकळकर (वय ६५, रा. वैशखखेडे, ता. जुन्नर, जि. पुणे)
२. विनोद केरूभाऊ रोकडे (वय ५०, रा. कांदळी, ता. जुन्नर जि. पुणे)
३. युवराज महादेव वाव्हळ (वय २३, रा. १४ नंबर कांदळी, ता. जुन्नर जि. पुणे)
४. चंद्रकांत कारभारी गुंजाळ (वय ५७, रा. कांदळी, ता. जुन्नर जि. पुणे)
५. गीता बाबुराव गवारे (वय ४५, १४ रा. कांदळी, ता. जुन्नर जि. पुणे)
६. भाऊ रभाजी बढे (वय ६५, रा. नगदवाडी, ता. जुन्नर जि. पुणे)
७. नजमा अहमद हनीफ शेख (वय ३५, रा. गडही मैदान, खेड राजगुरुनगर)
८. वशिफा वशिम इनामदार (वय ५)
९. मनिषा नानासाहेब पाचरणे (वय ५६, रा. १४ नंबर ता. जुन्नर जि. पुणे)

