• Tue. Mar 10th, 2026
    संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, वाल्मिक कराडच्या वकिलांनी काय सांगितलं?

    Walmik Karad Advocate Reaction: वाल्मिक कराड यांची अटक बेकायदेशीर असून त्यांना मीडिया प्रेशर खाली अटक करण्यात आली असल्याचा आरोप वाल्मिक कराडच्या वकिलांनी केला आहे.

    Lipi

    दीपक जाधव, बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात मकोका लावण्यात आलेला वाल्मिक कराडला आज बीड न्यायालयाने २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी कोर्टात दोन्ही पक्षाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. यानंतर वाल्मिक कराडचे वकील अशोक कवडे बाहेर येत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही अटक बेकायदेशीर असल्याचं सांगितलं.

    या प्रकरणाशी त्यांचा कुठलाही संबंध नाही बेकायदेशीर अटक केली जात आगे. खून प्रकरणामध्ये जे आरोपी अटक केलेत त्यांच्या चौकशीमध्ये असं कुठेही आढळून येत नाही की, वाल्मिक कराड यांचा संबंध येतो. अटक ही मीडिया प्रेशर खाली करण्यात आली आहे, असं वकील अशोक कवडे म्हणाले.

    खून प्रकरणांमध्ये कुठलेही कॉल झालेले नाहीत तर त्या संबंधीचा युक्तिवाद कोर्टामध्ये देखील झाला नाही. सीडीआर प्रमाणे त्यांना तपास करायचा आहे त्यासाठी त्यांना कोठडी हवी होती, या संदर्भात त्यांनी कोर्टासमोर युक्तिवाद मांडला.

    या प्रकरणांमध्ये त्यांना कस्टडीची गरजच नव्हती हेच आम्ही मांडत होतो. या अगोदर देखील आम्ही एसआयटी आणि सीआयडीच्या कस्टडीमध्येच होते, दुसऱ्या गुन्ह्यामध्ये ही कस्टडी मागायची आवश्यकता नव्हती. या अगोदरच्या कस्टडीमध्ये देखील तुम्ही ही चौकशी करू शकत होतात.

    मालमत्ता कोणाची आहे कुठे आहे, हे एका क्लिक वरती समजते, त्याला आरोपीची आवश्यकता नाहीये. खंडणी हा गुन्हा वेगळा आहे आणि खून प्रकरणाचा गुन्हा हा वेगळा आहे. तपासामध्ये असं कुठेही आढळून आलेलं नाही, या दोन्ही गुन्ह्याचा एकत्रित संबंध येतो, असं आमच्या पक्षाकाराचं म्हणणं आहे. एसआयटीचे आयओ काहीही म्हणतील, खून प्रकरणाचे मूळ हे खंडणी आहे, असा युक्तिवाद कोणी केला नाही आणि पोलिसांनीही देखील उल्लेख केला नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.

    डीवायएसपी गोल्ड आणि वाल्मिक कराड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, वकिलांनी घेतली उडी

    बीड डीवायएसपी गोल्ड आणि वाल्मिक कराड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आज वाद झाल्याचं पाहायला मिळालं. तुम्ही इथे काय करता तुम्ही कोर्ट कॅम्पसमध्ये का बसलात तुम्हाला किती वेळा सांगितलं इथून जा, असं डिवायएसपी गोल्ड त्या कार्यकर्त्यांना म्हणत होते. त्यावर त्यांच्या बाजूला बसलेले वकील पोलीस अधिकाऱ्याला म्हणाले की ते माझ्याकडे आले आहेत, मला त्यांच्या सह्या घ्यायच्या आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी वकिलाला सांगितले की, पटकन सह्या घ्या आणि इथून त्यांना जाऊ द्या नाहीतर नंतर बोलू. त्यानंतर वकिलामध्ये आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये जोरदार भांडण झाल्याचं पाहायला मिळालं. या सगळ्या वादामध्ये वाल्मिक कराडाच्या कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed