• Wed. Jan 8th, 2025
    नागपुरातील दोन HMPV रुग्णांबाबत जिल्ह्याधिकाऱ्यांची मोठी माहिती, सॅम्पलमध्ये विषाणूची शंका, पण….

    Authored byकरिश्मा भुर्के | Contributed by जितेंद्र खापरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 7 Jan 2025, 8:48 pm

    HMPV Virus in Nagpur : बेंगळुरूनंतर नागपुरात एचएमपीव्ही व्हायरसचे दोन रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. या दोन रुग्णांबाबत तसंच संपूर्ण परिस्थितीबाबत जिल्ह्याधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

    नागपुरातील दोन HMPV रुग्णांबाबत जिल्ह्याधिकाऱ्यांची मोठी माहिती, सॅम्पलमध्ये विषाणूची शंका, पण….

    जितेंद्र खापरे, नागपूर : चीनमधून ह्यूमन मेटान्यूमोवायरस एचएमपीव्ही (HMPV) चे रुग्ण देशात आढळल्यानंतर सर्वत्र गोंधळाची स्थिती आहे. मागील चार वर्षांपूर्वी आलेल्या कोविड-१९ व्हायरसप्रमाणे हा व्हायरस देखील भयंकर नाही ना अशी चिंता लोकांमध्ये व्यक्त केली जात आहे. या HMPV विषाणूचा पहिला रुग्ण बेंगळुरूमध्ये सापडला. बेंगळुरूमध्ये रुग्ण सापडल्याच्या काही दिवसांनी नागपूरमध्ये या विषाणीचे दोन रुग्ण आढळले.

    नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती

    नागपुरमधील दोन मुलांमध्ये HMPV पॉझिटिव्ह आढळल्यानंतर नागपुरकरांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. पण या विषाणूबाबत नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. विपिन इटनकर यांनी सर्व काही ‘अंडर कंट्रोल’ आहे आणि घाबरण्याची गरज नाही, असं आश्वासन नागपुरकरांना दिलं आहे.
    झाडावर लटकलेले कपडे, पाहावं तिथे मृतदेहाचे तुकडे; बॉम्ब ब्लास्ट इतका भयंकर की सगळंच संपलं

    नागपुरात मुलांमध्ये हा विषाणू आढळला होता का?

    नागपूरमधील दोन मुलांना ह्यूमन मेटान्यूमोवायरस एचएमपीव्ही (HMPV) ची लागण होण्याच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी सांगितलं की, जी मुलं आहेत, त्यांच्या ओपीडी चेकिंग दरम्यान त्यांचे सॅम्पल घेतले गेले होते. त्यांच्यावर झालेल्या तपासणीत या विषाणूची शंका व्यक्त झाली. पुढे बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं, त्यांचे सॅम्पल एम्स आणि एनआयव्ही अशा पुण्याच्या लॅबमध्ये पाठवले जातील. तेथून तपासणी केल्यानंतरच हे सांगता येईल की खरोखरच या मुलांमध्ये हा विषाणू आढळला होता का? सध्या त्या मुलांची स्थिती सामान्य आहे आणि ते घरी आहेत, अशी माहितीही जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिली आहे.
    रात्रीची वेळ, धावत्या एक्सप्रेसमध्ये सुरू होता खुनी खेळ, सकाळी प्रवासी हादरले; मध्यरात्री काय घडलं?
    जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी माहिती दिली की, आरोग्य विभागाने काही मार्गदर्शक सूचनांचे आदेश दिले आहेत, जे सर्व रुग्णालयांमध्ये, जिल्हा रुग्णालयात पाठवले जातील. यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांनी विनंती केली की, हा कोणता नवीन आजार किंवा विषाणू नाही, कोविडशी त्याचा काहीही संबंध नाही आणि घाबरण्याची आवश्यकता नाही. त्यांनी सांगितलं की, स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे, अशी माहिती सर्व लोकांनाही दिली जावी.
    Pune Crime: बायकोची माफी मागत रिक्षा चालकाने संपवले जीवन, अखेरच्या चिठ्ठीत ४ नावं, पिंपरी-चिंचवड हादरलं

    यापूर्वी हा विषाणू कुठे आढळला होता?

    जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी विषाणू कुठे आढळला, या प्रश्नावर बोलताना उत्तर दिलं, की हा HMPV विषाणू प्रथम २००१ मध्ये नेदर्लंड्समध्ये आढळला होता. हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे, श्वसनात (सर्दीप्रमाणे) संसर्ग निर्माण करतो. हा एक मौसमी आजार आहे, जो सामान्यत: फ्लूप्रमाणे हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीस होतो.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed