Newly Married Woman Ends Life: आकांक्षा विजय मंडलिक असे विवाहितेचे नाव आहे. सात महिन्यांपूर्वीच तिचा विवाह झाला होता. आकांक्षा दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या सासरकडील व्यक्तींनी ४ जानेवारी रोजी ओझर पोलिस ठाण्यात दाखल केली होती.
वैभव चंद्रभान जगझाप (वय ३४, रा. पालखेड मिरचीचे) यांच्या फिर्यादीवरून आकांक्षाचा पती विजय पुंडलिक मंडलिक, सासरे पुंडलिक राजाराम मंडलिक, सासू ठकूबाई पुंडलिक मंडलिक आणि नणंद सुवर्णा पुंडलिक मंडलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सासरकडील व्यक्तींनी लग्नाच्या दोन महिन्यानंतरच आकांक्षाचा शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. तिला मारहाण करून माहेरून १० लाख रुपये घेऊन येण्याचा तगादा लावण्यात आला.
Nashik: ‘सिव्हिल’मधील बाळ चोरीचा १२ तासांत उलगडा, एमबीए महिलेचं कृत्य, कारण धक्कादायक
सासरकडील मंडळींनीच तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. दरम्यान, आकांक्षा दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या सासरकडील व्यक्तींनी ४ जानेवारी रोजी ओझर पोलिस ठाण्यात दाखल केली होती. वैभव जगझाप यांच्या फिर्यादीवरून ओझर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक तुषार गरुड अधिक तपास करीत आहेत.
Baba Siddique Case: २६ आरोपींकडून ३५ मोबाइलचा वापर; बाबा सिद्दिकी प्रकरणात ४५९० पानांचे आरोपपत्र दाखल
दुसरी घटना: दोन तोळ्यांची पोत लांबवली
निफाड : पिंपळगाव बसवंत बसस्थानकातून वृद्ध महिलेची दोन तोळ्याची पोत चोरीला गेल्याची घटना घडली. शिरसगाव येथील सुमनबाई सुकदेव मोरे या कामानिमित्त निफाड येथे गेल्या होत्या. तेथून शिरसगावी परत येत असताना पिंपळगाव बसवंत येथे बसची वाट पाहत असताना त्यांची २१ ग्रॅमची पोत चोरीला गेली. पोत बॅगेत ठेवलेली असल्याने घरी गेल्यानंतर पोत चोरीला गेल्याचे सुमन मोरे यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आपल्या घरातील व्यक्तींना सर्व प्रकार सांगितला. याविषयी पिंपळगाव पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. पिंपळगाव बसवंत येथे काही महिलांची टोळी असून, या महिला निफाड फाटा ते बसस्थानक दरम्यान फिरतात आणि वृद्ध महिला, ज्येष्ठ नागरिक यांना हेरतात आणि त्यांच्याकडील दागिने, पैसे चोरतात, अशा अनेक तक्रारी येत पोलिसांकडे येत आहेत.