परभणी येथील मनोज जरांगे यांनी केलेल्या भाषणानंतर मनोज जरांगे यांच्या विरोधात तीव्र शब्दांत प्रतिक्रिया समोर येत आहेत.यामुळे सोलापुरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे.गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या वक्तव्यावर सोलापूर शहरातील मराठा बांधव आक्रमक प्रतिउत्तर दिले आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या तोंडाला आम्ही शेण लावणार असल्याचा इशारा दिला आहे.रस्ता आमच्या बापाचा नाही तर अख्खा महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे अशी प्रतिक्रिया मराठा बांधवानी दिली आहे.