Authored byमानसी देवकर | Contributed byअभिजित दराडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम5 Jan 2025, 11:27 am
पुण्यात पहिले रोटरी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ४ आणि ५ जानेवारी असे दोन दिवसीय हे संमेलन होत आहे. शनिवारी ४ जानेवारीला या साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. या संमेलनात साहित्यिक चर्चा घडणार असून विविध विषयांवर कविसंमेलन, परिसंवाद, आणि संगीत नाटकाचेही आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी निमंत्रितांचे कविसंमेलन पार पडले. यावेळी अध्यक्ष आणि लेखक रामदास फुटाणे यांनी वात्रटिका सादर केली. यात मनोज जरांगेंपासून छगन भुजबळ यांच्यावर भाष्य करण्यात आलं. तर मराठवाड्यातील आका या शब्दावरून देखील फुटाणे यांनी उपरोधिक काव्य सादर केले.