Chandrapur Crime News: नुकसान भरपाई संदर्भात बातचीत करताना मयताने आपल्या भावाला घटनेची माहिती दिली होती. मोबाईल ट्रेस न झाल्याने भावाने केलेल्या तक्रारीनंतर पोलीस तपास सुरू झाला. तपासादरम्यान चार अल्पवयीन आरोपींची नावे पुढे आली आहेत. घटनेत क्षुल्लक कारणावरून अल्पवयीन मुलाचा जीव गेल्याने परिसर हादरला आहे.
हायलाइट्स:
- चार अल्पवयीन मुलांनी केली एका अल्पवयीन मुलाची हत्या
- दुचाकीने जाताना गाडीचा कट लागून नुकसान झाल्याचे कारण
- चंद्रपूर शहराच्या गौतम नगर भागातील धक्कादायक घटना
संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये ९ जानेवारीला काम बंद आंदोलन
मुलांनी दिली गुन्ह्याची कबुली
पोलिसांनी परिसरात विचारपूस केली असता, मारहाण करणारे चार विधिसंघर्षग्रस्त बालके असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून चारही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. चौकीत या अल्पवयीन मुलांनी गुन्ह्याची कबुली दिली. मृतकाच्या दुचाकीची वाहनाला धडक बसली. नुकसानभरपाई द्यावी म्हणून महाकाली मंदिर गौतम नगरकडे घेऊन गेले. भरपाईच्या रकमेवरून वाद झाला. यावेळी लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत दगडाने ठेचून ठार केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात चार अल्पवयीन मुलांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास चंद्रपूर शहर पोलिस करीत आहेत.