• Sun. Aug 16th, 2026

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Dec 30, 2024
शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे – महासंवाद




मुंबई, दि. 30 : कृषी विभागातील केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. राज्याचे कृषिमंत्री म्हणून पदभार घेताना मंत्रालय येथे ते बोलत होते.

कृषी विभागात आवश्यक तिथे सुधारणा करून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल. केंद्र व राज्य शासनाच्या योजना राज्यात राबवताना अधिक समन्वय साधला जाईल. कृषी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात येईल. प्राधान्याने हाती घ्यावयाचे विषय, नवीन धोरणे यांचा अभ्यास करण्यात येईल. शेती आणि शेतकरी यांचा सर्वांगीण विकास हाच ध्यास असल्याचेही कृषिमंत्री ॲड.कोकाटे म्हणाले.

यावेळी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश गोंदावले, उपसचिव हेमंत म्हापनकर, उपसचिव संतोष कराड, उपसचिव प्रतिभा पाटील, उपसचिव अंबादास चंदनशिवे, उपसचिव प्रफुल्ल ठाकूर उपस्थित होते.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

 

 







हे मुंढे कोण आहेत? रिझर्व्हेशन लिस्टमध्ये नाव पाहताच रेस्टॉरंट चालक चपापले, मित्राचा फोन, तुकाराम मुंढेंच्या मुलाचा भन्नाट किस्सा
Central Railway : ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकण अन् उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना फटका; महत्त्वाच्या तीन गाड्या बंद, अडचणींचं कारण पुढे
रश्मी शुक्लांना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा, मिलिंद नार्वेकरांचं ट्वीट चर्चेत, ठाकरेंच्या विश्वासू नेत्याने पुन्हा बुचकळ्यात टाकलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed