Chetan Tupe meets Sharad Pawar : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे हडपसर विधासभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे हे शरद पवार यांच्या पुण्यातील मोदीबाग या निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी आले होते
काय म्हणाले चेतन तुपे?
त्यानंतर आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे हडपसर विधासभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे हे शरद पवार यांच्या पुण्यातील मोदीबाग या निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी आले होते. या भेटीनंतर चेतन तुपे यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सगळ्या महाराष्ट्राची जी इच्छा आहे ते दोन्ही पवार करतील असं चेतन तुपे हे शरद पवार यांच्या भेटीनंतर बोलल्याने पुन्हा एकदा दोन्ही पवार एक होणार का, ही चर्चा सुरू झाली आहे. चेतन तुपे आज रयत शिक्षण संस्थेच्या कामासाठी शरद पवार यांना भेटण्यासाठी आले होते त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
Ravindra Waikar : खासदार रवींद्र वायकरांच्या गाडीला मुंबईत अपघात, कारची टेम्पोला जोरदार धडक
शरद पवारांच्या भेटीनंतर चेतन तुपे म्हणाले, साहेब आमच्या सर्वांचेच आहेत. साहेब आमच्या घरातील व्यक्ती असल्यासारखे आहेत. कायम राजकारण हा विषय नसतो साहेबांचे आणि माझे कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला राजकारणाशी जोडू नये. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझे वडील विठ्ठल तुपे असतील किंवा अजित दादांच्या नेतृत्वाखाली मी असेच शिकलो आहे की राजकारण हा केवळ एक महिन्यापुरता विषय असतो. एवढा एक महिन्यापूर्वी राजकारण करायचं असतं आणि त्यानंतर विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकायचे असतात. त्यामुळे साहेबांची माझ्या वडिलांची आणि दादांची जी शिकवण आहे त्यानुसार प्रत्येक गोष्टीत आम्ही राजकारण पाहत नाही.
Balya Mama Mhatre : टोलनाक्यावर लांब रांगा, बाळ्या मामांचा पारा चढला, रस्त्यावर उतरुन टोलवाल्यांना धारेवर धरलं
तर, दोन राष्ट्रवादी एकत्र यावेत हा निर्णय मोठ्या पातळीवरचा आहे एक छोटा कार्यकर्ता आहे. दोन्ही पवार नेहमी सांगतात, एकमेकांना भेटतात वाढदिवसाच्या एकमेकांना शुभेच्छा देतात त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे ती ते करतील. असं देखील तुपे म्हणाले आहेत.
Chetan Tupe : ‘महाराष्ट्राच्या मनात आहे, ते दोन्ही पवार करतील’, शरद पवारांच्या भेटीनंतर दादांचा आमदार थेट बोलला
सुनंदा पवार यांनी देखील केली होती इच्छा व्यक्त
अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही गटाने अर्थात राष्ट्रवादीने एकत्र येण्याची गरज आहे, मूठ घट्ट राहिली पाहिजे, असं वक्तव्य शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी केलं होत. कुटुंब म्हणून आता एकत्र येण्याची गरज असल्याचेही सुनंदा पवार म्हणाल्या होत्या.