• Wed. Jan 1st, 2025
    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिलं यशस्वी लँडिंग, कधी सुरू होणार एअरपोर्ट?

    Navi Mumbai International Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो A320 हे प्रवासी विमान यशस्वीरित्या लॅंड झालं आणि विमानतळावर एकच जल्लोष झाला. आता लवकरच हे विमानतळ सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे.

    Lipi

    अमुलकुमार जैन, रायगड : नवी मुंबईकरांसाठी आजचा दिवस खास ठरला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज २९ डिसेंबर रोजी दुपारी पहिल्या व्यावसायिक विमानाचं यशस्वीरित्या लँडिंग झालं. धावपट्टीवर उतरण्यापूर्वी इंडिगो A320 विमानाने आकाशात ३ ते ४ घिरट्या घातल्या. त्यानंतर विमान यशस्वीपणे नवी मुंबई विमानतळावरील धावपट्टीवर उतरवण्यात आलं. इंडिगो A320 प्रवासी विमान १ वाजून ३८ मिनिटांनी लॅंड झालं आणि विमानतळावर एकच जल्लोष झाला. याच जल्लोषात हे विमानतळ सुरू करण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
    Raigad News : आनंदाचा क्षण दु:खात बुडाला, पुण्यातील शिक्षकासोबत काशीद समुद्रावर अनर्थ घडला

    कधी सुरू होणार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ?

    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा रनवे, सिग्नल यंत्रणा अशी सर्व महत्वाची कामं जवळपास पूर्ण झाल्याची माहिती समोर येत असून विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं काम अंतिम टप्प्यात आहे. महिन्याभरापूर्वीच लष्कराच्या विमानाची यशस्वी लँडिंग टेस्ट करण्यात आली होती. त्यामुळे आता थेट व्यावसायिक विमानाचं लँडिंग करण्यात आलं असून यावेळी सिडको आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. १७ एप्रिल २०२५ रोजी या विमानतळावरुन पहिलं टेक-ऑफ केलं जाणार असल्याची माहिती नवी मुंबई विमानतळाच्या सीईओ यांनी दिली आहे.
    तो दारुच्या नशेत नव्हता…. विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांच्या भेटीनंतर जुन्या मित्राचा दावा
    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सीईओ बी.व्ही.जेके शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘१७ एप्रिल २०२५ मध्ये पहिलं प्रवासी आणि कार्गो विमान सुरू होईल. त्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. तसंच, सर्व परवानग्या मार्चपर्यंत मिळतील. १७ एप्रिल रोजी देशांतर्गंत विमानसेवेचे उद्घाटन होईल तर, आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे उद्घाटन होण्यास जून उजाडेल,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
    जोगेश्वरी – ठाणे दीड तासाचं अंतर २० मिनिटांत पार, गोरेगाव – मुलुंड लिंक रोडचं काम कधी पूर्ण होणार? एका गोष्टीने कामात अडथळा

    Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिलं यशस्वी लँडिंग, कधी सुरू होणार एअरपोर्ट?

    पनवेलमधील विमानतळ प्रमुख शहरांना जोडणार

    नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी होणार आहे. नवी मुंबईत हे विमानतळ मुंबईपासून ४० किमी अंतरावर असणाऱ्या पनवेलजवळ बांधण्यात आलं आहे. ११६० हेक्टर परिसरात हे विमानतळ बांधण्यात आलं आहे. नवी मुंबई विमानतळ जगातील प्रमुख शहरांशी जोडलं जाणार आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed