खातेवाटप मार्गी लागल्यानंतर नवे मंत्री त्यांच्या मतदारसंघांमध्ये परतले आहेत. हिवाळी अधिवेशन संपवून आपापल्या मतदारसंघांमध्ये परतलेल्या नव्या मंत्र्यांचं जोरदार स्वागत सुरु आहे. मंत्रिपदासाठी लॉबिंग करणारे आमदारा आता पुन्हा एकदा फिल्डींग लावताना दिसत आहेत.
१५ डिसेंबरला ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर खातेवाटप होण्यास आठवडा लागला. आता मंत्री नागपूरहून त्यांच्या मतदारसंघात परतले आहेत. मंत्रिपद मिळाल्यानंतर आता पुढची शर्यत पालकमंत्रिपदासाठी सुरु आहे. राज्यातील तब्बल ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदांसाठी अनेकांची नावं चर्चेत आहेत. त्यामुळे पालकमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.
पवारांचे शिंदे दादांच्या मंत्र्यांच्या भेटीला; नाराज भुजबळांच्या जखमेवर मीठ चोळणारी घोषणा
ठाणे, पुणे, रायगड, नाशिक, बीड, सातारा, छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रिपद कोणाला मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. काही जिल्ह्यांना दोन, तर काही जिल्ह्यांना चार मंत्रिपदं मिळाली आहेत. त्यामुळे पालकमंत्रिपदासाठी तीव्र स्पर्धा आहे. कुठे एकाच पक्षाच्या दोन मंत्र्यांमध्ये, तर कुठे मित्रपक्षाच्या मंत्र्यांमध्ये जोरदार चढाओढ दिसत आहे. त्यामुळे मंत्रिपदाची शर्यत संपताच पालकमंत्रिपदासाठीची स्पर्धा सुरु झाली आहे.
Chhagan Bhujbal: भुजबळांविरोधात एकी, खातेवाटपानंतर चर्चा ‘त्या’ बॅनर्सची; समीकरणानं कोणाला बळ? कोणाला झळ?
कोणत्या जिल्ह्यांसाठी चुरस? कोण ठरणार सरस?
ठाणे- एकनाथ शिंदे (शिवसेना), गणेश नाईक (भाजप)
रायगड- आदिती तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस), भरत गोगावले (शिवसेना)
नाशिक- गिरीश महाजन (भाजप) दादा भुसे (शिवसेना) नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी काँग्रेस), माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस)
जळगाव- गुलाबराव पाटील (शिवसेना), संजय सावकारे (भाजप)
पुणे- अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), चंद्रकांत पाटील (भाजप)
बीड- पंकजा मुंडे (भाजप), धनंजय मुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
छत्रपती संभाजीनगर- संजय शिरसाट (शिवसेना), अतुल सावे (भाजप)
यवतमाळ- अशोक उईके (भाजप) संजय राठोड (शिवसेना), इंद्रनिल नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस)
सातारा- शंभुराज देसाई (शिवसेना) शिवेंद्रराजे भोसले (भाजप), जयकुमार गोरे (भाजप), मकरंद पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
रत्नागिरी- उदय सामंत (शिवसेना) योगेश कदम (शिवसेना)
कोल्हापूर- हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रकाश आबिटकर (शिवसेना)