Sanjay Raut: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या बंगल्याची दोन अज्ञात व्यक्तींनी रेकी केली आहे. खासदार राऊत मुंबईच्या पूर्व उपनगरात असलेल्या भांडूपमध्ये राहतात.
आज (२० डिसेंबर) सकाळी सव्वा नऊ ते साडे नऊच्या सुमारास राऊत यांच्या मैत्री बंगल्याची रेकी करण्यात आली. दुचाकीवरुन दोन अज्ञात व्यक्ती राऊत यांच्या घराच्या मागील बाजूस आल्या होत्या. अतिशय काही सेकंद ते तिकडे थांबले. त्यानंतर ते यू टर्न घेऊन निघून गेले. त्यातील एकानं हेल्मेट घातलेलं होतं. तर दुसऱ्यानं त्याचा चेहरा पूर्णपणे झाकलेला होता. हे दोघे अज्ञात नेमके कोण होते, त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
संजय राऊत भांडूपमध्ये वास्तव्यात आहेत. ते मैत्री बंगल्यात राहतात. या बंगल्याच्या मागील बाजूस आज सकाळी दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरुन आल्या होत्या. त्यांनी राऊत यांच्या घराची रेकी केली. अज्ञातांकडे ८ ते १० मोबाईल होते. सध्याच्या घडीला पोलीस राऊत यांच्या घरी पोहोचले आहेत. राऊत यांच्या घराची आधीही रेकी करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे.
रेकी करणाऱ्या दोघांची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहे. राऊत यांच्या बंगल्याची रेकी करणारे दोघे नेमके कोण आहेत, ते त्यांच्या बंगल्याच्या परिसरात का आले होते, त्यांचा हेतू नेमका काय, या प्रश्नांची उत्तरं पोलीस शोधत आहेत. त्यासाठी पोलीस सध्या राऊत यांच्या घरी पोहोचले आहेत.