विधानसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार पुन्हा सिल्लोडमधून निवडून आले. मात्र नव्या सरकारच्या मंत्रिमंडळातून त्यांना डावलण्यात आले. परंतु अडीच वर्षांनंतर मी मंत्री म्हणून पुन्हा येईन असे विधान सत्तारांनी केले आहे. मंत्रिपद नसल्याने मी नाराज नाही आणि कार्यकर्त्यांनी नाराज राहू नये, असेही ते म्हणाले.