• Sat. Mar 7th, 2026

    अमेरिकेकडून अत्यंत मोठा निर्णय या निर्णयातून भारताचा मोठा फायदा होणार

    ByMH LIVE NEWS

    Mar 6, 2026
    अमेरिकेकडून अत्यंत मोठा निर्णय या निर्णयातून भारताचा मोठा फायदा होणार

    इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष वाढला आहे. आज युद्धाला सात दिवस पूर्ण झाली. इस्त्रायल आणि अमेरिकेने मिळून इराणवर हल्ला केला. युद्धाला सुरूवात झाल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत इराणच्या सर्वाेच्च नेत्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या सर्वाेच्च नेत्याचीही हत्या करण्यात आली. आयातुल्ला अली खामेनेई यांचा मुलगा मोज्तबा खामेनेई याच्याकडे इराणची जबाबदारी असून इराणचा सर्वाेच्च नेत्या म्हणून घोषणा करण्यात आली. इराण त्याच्या इतिहासातील सर्वात वाईट काळातून जात आहे. परिस्थिती अधिक तणावात आहे. मोज्तबा खामेनेई यांच्या नावाची घोषणा करताच इस्त्रायलकडून मोठी धमकी देत सांगण्यात आले की, आम्ही इराणच्या सर्वाेच्च नेत्यालाही ठार करू. यादरम्यानच अमेरिकेने भारतातून इराणच्या दिशेने निघालेल्या इराणी युद्धनाैकेवर हल्ला केला आणि त्यामधील 87 सैनिकांचा मृत्यु झाला. या घटनेने मोठी खळबळ उडाली. सध्या परिस्थिती अधिक बिघडल्याचे बघायला मिळत आहे.

    इराणने इस्त्रायल आणि अमेरिकेसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान महत्वाचा समुद्री मार्ग बंद केला, ज्याने खळबळ उडाली. भारतात इराणचा समुद्री मार्ग स्टेट ऑफ होर्मुजच्या माध्यमातून मोठ्य संख्येने तेल येते, तोच मार्ग इराणकडून बंद करण्यात आला. ज्यामुळे भारतात होणाऱ्या तेल पुरवठा आणि एलपीजी गॅसच्या पुरवठ्यामध्ये तुटवडा निर्माण झाला.

    मागील काही वर्षांपासून भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतो. मात्र, रशियाकडून तेल खरेदीबाबत अनेक निर्बंध भारतावर अमेरिकेने लादली आहेत. तेल पुरवठा विस्कळीत झाल्याने भारताने थेट रशियाकडून तेल खरेदी करण्यास सुरूवात केली. विशेष म्हणजे याला थेट अमेरिकेनेही मान्यता दिली आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी करावे, असे स्पष्ट शब्दात अमेरिकेने म्हटले आहे. मात्र, ही सूट फक्त 30 दिवसांकरिता दिली आहे. सध्या इराणने त्यांचा समुद्री मार्ग बंद केल्याने सर्व तेलाचे आणि गॅसचे टॅंकर अडकून पडले असून मोठा जाम लागला आहे.

    यावर बोलताना अमेरिकी सरकारची मंत्री स्कॉट बेसेंट यांनी म्हटले की, ग्लोबल मार्केटमध्ये तेलाची निर्यात आणि आयात सुरू ठेवण्याकरिता भारतीय रिफायनर्सला रशियाकडून तेल खरेदी करण्याची परवानगी आम्ही दिली. ही परवानगी पुढील 30 दिवसांकरिता असेल. सध्या समुद्रमार्गात जी स्थिती निर्माण झाली, त्यानंतर हा निर्णय आम्ही घेतली. यातून रशियाला फार काही फायदा होणार नाहीये. हे अत्यंत कमी कालावधीकरिता असल्याने त्यांना फायदा होणार नाही.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed