Aaditya Thackeray Slams Amit Shah: अमित शहांच्या बाबासाहेब आंबेडकरांवरील वक्तव्याचा निषेध करतो. भाजपच्या मनात जे आहे, ते गृहमंत्री अमित शाहा यांच्या भाषणात आले, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरेंची अमित शाहांवर टीका
आदित्य ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शहांच्या भाषणावर टीका करत म्हटलं की, “केंद्रीय गृहमंत्री यांच्या मनात जे होतं ते त्यांच्या तोंडावर आले आहे. त्यांनी काल महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे,” असे स्पष्टपणे सांगितले. आदित्य ठाकरे यांनी यावरून भाजपच्या मानसिकतेवर जोरदार हल्ला केला आहे. पुढे आदित्य ठाकरे म्हणाले, भाजपच्या मनात जे आहे, ते गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणात व्यक्त झाले आहे,” असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
फॅशन म्हणजे काय? अमित शाहांनी सांगावं, आदित्य ठाकरे संतापले
पुढे बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, ते जे म्हणाले भाषणात त्यांनी स्वतः म्हटले आहे. की जे काही आंबेडकर, आंबेडकर, म्हणणं फॅशन झालं आहे. तर त्यांनी सांगावं की, फॅशन म्हणजे काय..? आणि त्यापेक्षा देवाचे नाव घेतलं असतं तर स्वर्ग प्राप्त झालं असतं. पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले करोडो लोकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देवचं आहे. जसं त्यांनी या देशाला संविधान दिलं न्याय हक्क दिला अधिकार दिले त्यामुळे ते देवा सारखेच आहे.
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, जर अमित शाहा यांनी चुकून काय बोलले असेल तर माफी मागून मोकळं व्हावं. पण ते चुकून नाही म्हणाले त्यांच्या मनात जे होतं ते आलं आहे. संविधानावर चर्चा सुरू असताना हे भाषण आला आहे त्यामूळे भाजपची ही मानसिकता लोकांसमोर आली आहे.