• Sat. Dec 28th, 2024
    चायनीज पकोडे स्टॉलवाल्याचा हात ग्राइंडिंग मशिनमध्ये अडकला, दादरमध्ये तरुणाचा हृदयद्रावक अंत

    Chinese Pakode Stall worker hand crushed : दादर येथे चायनीज पकोडे, भेळ बनविण्याचा कच्चा माल तयार करण्याच्या मशीनमध्ये हात अडकल्याने कामगाराचा मृत्यू झाला.

    महाराष्ट्र टाइम्स

    मुंबई : कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने त्यांचे नाहक बळी गेल्याच्या दोन घटना मुंबईतून समोर आल्या आहेत. दादर येथे चायनीज पकोडे, भेळ बनविण्याचा कच्चा माल तयार करण्याच्या मशीनमध्ये हात अडकल्याने कामगाराचा मृत्यू झाला. तर बोरिवली येथे इमारतीच्या रंगकामासाठी उभारलेल्या परांचीवरून चौथ्या मजल्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. दोन्ही घटनांसाठी जबाबदार असलेल्यांवर दादर आणि बोरिवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    दादरमध्ये तरुणाचा मशिनमध्ये हात अडकून मृत्यू

    वरळी येथील नॅशनल डेअरी येथे चायनीज भेळ, पकोडे, मंच्युरियनचा स्टॉल आहे. तर आदर्श नगर परिसरात यासाठी लागणारा कच्चा माल तयार केला जातो. पीठ मळणे, भाज्या कापण्याचे काम मोठ्या ग्रायंडरवर केले जाते. स्टॉलवरील साहित्य संपल्याने मालकाने सूरज यादव (१९) या कामगाराला तिथे पाठविले. ग्रायंडर मशीन चालविण्याचा कोणताही अनुभव नसलेला सूरज गेला तो बऱ्याच वेळेनंतरही परतलाच नाही.

    मालक तसेच इतर कामगारांनी जाऊन पाहिले असता त्याची उजवी बाजू ग्रायंडरमध्ये अडकली होती. सूरजला बाहेर काढण्यासाठी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. सूरजला तत्काळ ‘केईएम’ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी सूरजच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चायनीज स्टॉल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
    Goa Youth Death : ताई-जिजूंसोबत गोवा गाठलं, पण सकाळीच आक्रित, पुण्यात राहणाऱ्या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू

    बोरिवलीत परांची काढताना तोल जाऊन मृत्यू

    दुसरीकडे, बोरिवली पश्चिमेकडील पुष्पा पार्क या इमारतीचे गेल्या महिन्यात रंगकाम सुरू होते. हे काम संपल्यानंतर इमारतींभोवती बांधण्यात आलेली परांची काढण्यात येत होती. परांचीचे बांबू सोडत असताना तोल गेल्याने चौथ्या मजल्यावरून इस्माइल जुमेद हा कामगार कोसळला.

    Mumbai News : चायनीज पकोडे स्टॉलवाल्याचा हात ग्राइंडिंग मशिनमध्ये अडकला, दादरमध्ये तरुणाचा हृदयद्रावक अंत

    Trupti Mulik : अजित दादांची गाडी चालवल्याने कौतुक, महिला चालक तृप्ती मुळीकला अटक, ८४ लाखांचा गंडा घातल्याचा आरोप
    पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता कोणतीही संरक्षक जाळी लावण्यात अली नसल्याचे निदर्शनास आले. सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना न केल्याने कंत्राटदार आणि सुपरवायझर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed