Nitesh Rane On Rahul Gandhi : वीर सावरकरांबाबत राहुल गांधींनी दिलेल्या वक्तव्यावर भाजपने आता उद्धव ठाकरेंना याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे.राहुल गांधी जे बोलतात ते त्यांना मान्य आहे का? असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.
“उद्धव ठाकरे अजूनही महाविकास आघाडीत असून त्यांनी हिंदुत्वाबद्दल मोठमोठ्या वार्ता सुरू केल्या आहेत. राहुल गांधी सावरकरांबद्दल रोज काय बोलतात यावर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने सर्वात आधी प्रतिक्रिया द्यावी”. असे नितेश राणे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले.
महायुती धर्मांतरविरोधी कायदा कधी आणणार?
धर्मांतरविरोधी कायद्याबाबत विचारणा केली असता नितेश राणे यांनी, ” जो धर्मांतर विरोधी कायदा सर्व राज्यांमध्ये आहे, तसाच कायदा महाराष्ट्रातही आणावा लागेल. आणि याबद्दल आम्ही आमच्या जाहीरनाम्यातच तसं लिहिलं आहे. त्यावर आम्ही काम करू.” अशी माहिती प्रसारमाध्यमांना दिली.
राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपची नाराजी
शिवसेना नेत्याने संसदेत इंदिरा गांधींच्या पत्राचा उल्लेख केला होता. ज्याला उत्तर देत राहुल गांधी लोकसभेत म्हणाले की, “याबाबत मी इंदिरा गांधींशी बोललो होतो. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की सावरकरांनी इंग्रजांशी करार केला होता. एक पत्र लिहून त्यांनी इंग्रजांची माफी मागितली आहे”, राहुल गांधींच्या या वादग्रस्त वक्तव्यावर भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना दोन्ही पक्ष नाराज आहेत.
दरम्यान, वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनीही राहुल गांधींच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. रणजित सावरकर यांनी राहुल गांधींनी वाचलेल्या कागदपत्राचा स्रोत काय? असा सवाल केला. राहुल गांधींच्या बोलण्यात तथ्य नाही असेही ते म्हणाले.