• Sun. Jan 5th, 2025
    लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून? पुरवणी मागण्यांच्या आकड्यांमधून महत्त्वाचे अपडेट

    Ladki Bahin Yojana: महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती आहे. सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजनेतील मदतीचा हफ्ता १५०० रुपयांवरुन २१०० रुपये करणार अशी घोषणा महायुतीनं केली होती.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    नागपूर: महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती आहे. सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजनेतील मदतीचा हफ्ता १५०० रुपयांवरुन २१०० रुपये करणार अशी घोषणा महायुतीनं केली होती. पण या २१०० रुपयांसाठी लाडक्या बहिणींना बरीच प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. कारण सध्या तरी लाडक्या बहिणींना दिला जाणारा हफ्ता वाढवण्याच्या मानसिकतेत सरकार नाही.

    लाडक्या बहिणींसाठी पुरवणी मागण्यांमध्ये १४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. योजनेतील तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी ही तरतूद करण्यात आल्याचं समजतं. महिलांना दिले जाणारा हफ्ता १५०० रुपयांवरुन २१०० रुपये करण्याची तरतूद अद्याप तरी करण्यात आलेली नाही. त्यामुळे महिलांना २१०० रुपयांसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
    महायुतीतलं ‘ते’ १ मंत्रिपद कोणासाठी? चर्चा ऑपरेशन लोटस अन् देवाभाऊंच्या ‘ट्युशन टीचर’ची
    लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढवण्यासाठी प्रशासकीय आणि सरकारी पातळीवर सध्या तरी कोणत्याही हालचाली सुरु नाहीत. पुरवण्या मागण्यांमध्ये अवघ्या १४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. योजनेसाठीच्या तांत्रिक आणि प्रशासकीय बाबी पूर्ण करण्यासाठी ही तरतूद करण्यात आलेली आहे. यामधून १५०० रुपयांचा हफ्ता २१०० रुपये करणं शक्य होणार नाही.

    लाडकी बहीण योजनेवर होणारा वार्षिक खर्च ४६ हजार कोटी रुपयांच्या घरात जातो. जुलै ते मार्च या कालावधीत योजनेवर ३६ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यातील १७ हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. डिसेंबर ते मार्च या कालावधीत १९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. लाडकी बहीण योजनेवर महिन्याकाठी ३५०० कोटी रुपयांचा खर्च होतो.
    Devendra Fadnavis: सरकारमधून बडा नेता आऊट, दिग्गज नेता इन; शिंदेंना ठाण्यात शह देण्यासाठी फडणवीसांची फिल्डींग
    लाडकी बहीण योजनेचा हफ्ता २१०० रुपये करायचा असल्यास बजेटमध्ये मोठी वाढ करावी लागेल. दर महिन्याला किमान १ हजार कोटी रुपयांची वाढ केली तरच २१०० रुपयांचा हफ्ता लाडक्या बहिणींना दिला जाऊ शकतो. त्यामुळे शिल्लक असलेले १९ हजार कोटी अधिक आता करण्यात आलेली १४०० कोटी रुपयांची तरतूदही २१०० रुपयांचा हफ्ता करायचा असल्यास कमी पडेल.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed