Baramati News: बारामतीतील वसंतराव पवार मार्गावरील दत्त मंदिर विधानसभा निवडणुकीपूर्वी रस्ते रुंदीकरणाच्या कामात हटवण्यात आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पूर्वी असणाऱ्या मंदिरापासून काही अंतरावरच दत्त मंदिराचे भूमीचे पूजन केले.
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बारामती दौऱ्यावर आले व दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर मंदिराचे भूमिपूजन केले. दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून अजित पवारांकडे पाहिले जाते आणि त्याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली. त्यांचा हा दौरा खाजगी होता. ते काटेवाडीत आईच्या भेटीसाठी आले होते. मात्र त्यांनी विमानतळावर उतरताच गाड्याचा ताफा थेट आमराई मध्ये नेण्याची सूचना केली आणि आमराईतील दत्त मंदिर उभारण्यात येणाऱ्या नियोजित जागेची सकाळी पाहणी केली. आणि सायंकाळी चार वाजता त्यांनी मंदिराच्या कामाचे भूमिपूजन केले.
Sneha Reddy Net Worth: अल्लू अर्जुनची रियल लाइफ ‘श्रीवल्ली’ स्नेहा रेड्डीबद्दल जाणून घ्या; काय करते, इतक्या कोटींचे नेटवर्थ
शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. रस्ते रुंदीकरणाच्या कामात दत्त मंदिर हे रस्त्यात येत होते. त्यामुळे सदर मंदिर रातोरात हटविण्यात आले होते. त्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. हा नाराजीचा सूर अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचला होता. जनतेच्या भावना लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या सांगता सभेत सदर मंदिर मूळ ठिकाणापासून काही अंतरावरच भव्य दिव्य उभारू असा शब्द दिला होता. त्यानुसार आज या कामाची भूमिपूजन करण्यात आले.

