Kurla Bus Crash: कुर्ल्यात बेस्ट बसनं अनेकांना चिरडल्याची घटना सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास घडली. आरोपी बस चालक संजय मोरेची पोलीस चौकशी सध्या सुरु आहे.
‘गेल्या ३० वर्षांपासून मी चालक म्हणून काम करत आहे. या कालावधीत माझ्याकडून कोणतीही चूक झालेली नाही. कोणता अपघातही माझ्या हातून घडलेला नाही. बस अचानक अनियंत्रित कशी झाली, नेमकं काय झालं, बसमध्येच बिघाड होता का, याबद्दल काहीच माहीत नाही,’ असं मोरे सातत्यानं पोलिसांना सांगत आहे. संजय मोरेला २१ डिसेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
Kurla Bus Accident: मी पटकन बाजूला झालो; पण शेवटच्या क्षणी एक महिला…; रहिवाशानं सांगितला बाका प्रसंग
संजय मोरेला मिनीबस चालवण्याचा अनुभव आहे. पण त्याला मोठी बस चालवण्यास देण्यात आली. मोठी बस चालवण्याचा कोणताही अनुभव त्याच्या गाठिशी नाही. त्यासाठी त्याला केवळ तीन दिवसांचंच प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बेस्टनं दिलेल्या प्रशिक्षणाबद्दल मोरेनं पोलिसांना अधिक माहिती दिली आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
‘इलेक्ट्रिक बस हाताळणीचे तीन दिवसांचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं. त्यातील दोन दिवस संगणकावर इलेक्ट्रिक बसच्या कार्यप्रणालीची माहिती देण्यात आली. तिसऱ्या दिवशी थेट बस हाती देण्यात आली. बस अनियंत्रित कशी झाली याची मला कोणतीही कल्पना नाही,’ अशी माहिती मोरेनं पोलिसांना दिली आहे.
Kurla Bus Accident: बस मला चिरडणारच होती, तितक्यात…; ‘त्या’ २ सेकंदांमुळे अमन वाचला; अपघाताचा थरार सांगितला
काय घडलं अपघाताच्या दिवशी?
संजय मोरेनं १ डिसेंबरपासून इलेक्ट्रिक बस चालवण्यास सुरुवात केली. कुर्ला ते अंधेरी मार्गावर तो बस चालवायचा. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास तो कामावर आला. त्यानंतर संध्याकाळी ४ वाजता तो इलेक्ट्रिक बसची पहिली फेरी गेऊन गेला. दोन फेऱ्या व्यवस्थित झाल्यानंतर त्याच्या ड्युटीचे ६ तास पूर्ण होत आले होते. त्यामुळे तिसरी फेरी साकीनाक्यापर्यंत देण्यात आली. ते आगारातून बस घेऊन बाहेर पडले आणि पुढच्या काही सेकंदांमध्ये अपघात घडला.