ShivSena UBT: लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही कोकणात ठाकरेसेनेची कामगिरी अतिशय सुमार झाली. याचे पडसाद रत्नागिरीत उमटले. माजी खासदार विनायक राऊत यांच्यासमोरच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये खडाजंगी झाली.
विधानसभा निवडणुकीत आपण प्रामाणिकपणे काम केल्याचं सिद्ध करण्यासाठी उद्धवसेनेचे कार्यकर्ते पीर बाबर शेख दर्ग्यात गेले. तिथे त्यांनी पक्षासाठी निष्ठेनं काम केल्याची शपथ घेतली. ग्रामदैवत किंवा एखाद्या प्रसिद्ध मंदिरात, जागृत देवस्थानी जाऊन शपथ घेण्याला कोकणात एक आगळंवेगळं महत्त्व आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसैनिकांनी घेतलेली शपथ महत्त्वाची ठरते. पक्षफुटीनंतर कोकणातील बहुतांश आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले. केवळ तीन जण ठाकरेंसोसबत राहिले. यातील दोघांचा यंदाच्या निवडणुकीत पराभव झाला.
Rohit Patil: अजितदादांचा फोन आलेला का? रोहित पाटलांचं स्पष्ट उत्तर; चीफ व्हिप असल्याची आठवण करुन देत हसले
लोकसभा निवडणुकीत ठाकरेसेनेचा रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्गात पराभव झाला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या पक्षाला कोकणात केवळ एक जागा मिळाली. निवडून येण्याची अपेक्षा येणाऱ्या काही जागांवरही ठाकरेंचे उमेदवार पराभूत झाले. यानंतर आरोप-प्रत्यारोपांचा सुरुवात झाली. पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी कामच केलं नसल्याचे आरोप झाले. यावरुन चारच दिवसांपूर्वी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यासमोर कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. आरोप, प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.
भाजप पुन्हा एकदा ‘शिंदे पॅटर्न’ राबवण्याच्या तयारीत; CMची खुर्ची धोक्यात, मित्रपक्ष भडकला
आपण निवडणुकीत पक्षाचं काम निष्ठेनं केलं आहे, असा कार्यकर्त्यांचा दावा होता. आपण चुकीचं काही केलेलं नाही. पक्षाचा घात केलेला नाही. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा आपण देवासमोर जाऊन शपथ घ्यायची, असं कार्यकर्त्यांचं ठरलं. यानंतर आज उद्धवसेनेचे कार्यकर्ते पीर बाबर शेख दर्ग्यात गेले. आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी त्यांनी शपथ घेतली. यावेळी उद्धवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि जिल्हा सहसंपर्क प्रमुख मात्र गैरहजर होते. मात्र यासंदर्भात त्यांच्याशी त्यांच्याशी बोलणं होऊ शकलेलं नाही.