Ajit Pawar: महाविकास आघाडीच्या आमदारांनी नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सुरू असताना सभात्याग केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित आमदारांना स्पष्ट शब्दात पाहा काय म्हटले.
नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेण्यासाठी उद्याचा शेवटाच दिवस आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावी लागले. तरच सोमवारपासून सभागृहाच्या कामकाजात सभागी होता येईल, अशा शब्दात अजित पवारांनी मविआच्या आमदारांना इशारा दिला. सर्व निर्वाचित आमदारांना या प्रकियेबाबत माहिती आहे. मात्र आपण काही तरी वेगळ करतोय हे दाखवण्याचा प्रकर सुरू असल्याचे अजितदादा म्हणाले.
लोकशाहीत प्रत्येक पक्षाला आणि नेत्याला बोलण्याचा अधिकार आहे. काय बोलायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तीक अधिकार आहे, असे अजित पवार म्हणाले. यावेळी अजित पवारांनी ईव्हीएम बाबत विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना उत्तर दिले. आपण मविआमध्ये काम केले आहे. निवडणुकीत पराभव झाला म्हणून ईव्हीएमला दोष देण्यात अर्थ नाही. लोकसभेत जेव्हा मविआला ३१ जागा मिळाल्या तेव्हा ईव्हीएम चांगले होते. आणि आता असा निकाल लागल्यावर दोष देण्यास सुरूवात केली असे अजित दादा म्हणाले.