Devendra Fadnavis Father In Law Sharad Ranade Reaction : देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांच्या सासऱ्यांनी डॉ. शरद रानडे यांनी आनंद व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे.
फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाच्या तिसऱ्या पर्वाला आज ५ डिसेंबर रोजी प्रारंभ झाला. मुखमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं रात्री उशिरा मुंबई येथील त्यांच्या वर्षा निवासस्थानी आगमन झालं. यावेळी त्यांच्या स्वागताला निघालेले डॉ. शरद रानडे यांच्याशी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
‘देव शपथे’चा शहरात हर्षोल्हास, सगळीकडे दिवाळी; ठिकठिकाणी फुटले फटाके, चॉकलेट-मिठाई वाटून आनंद साजरा
ते पुढे म्हणाले की, देवेंद्रजी मुख्यमंत्री असतानाही, उपमुख्यमंत्री झाल्यानंतरही आणि विरोधी पक्ष नेते असतानाही ते तितकेच व्यग्र होते आणि आता ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले आहेत. अशावेळी घराकडे फार वेळ देता येणं हे मुश्किल असतं. त्यांना विकासाचं उत्तम व्हिजन आहे. डॉ. शरद रानडे यांनी सांगितलं, की आपण दोन-तीन दिवसांपूर्वीच या शपथविधी सोहळ्यासाठी नागपूर येथून मुंबई येथे आलो आहोत. ते तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असा आपल्याला पूर्णपणे विश्वास होता, असंही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केलं.
अजित पवारांच्या नावावर झाला अनोखा विक्रम; याबाबत दादांच्या जवळपास कोणी नाही, असा आहे त्यांचा A to Z राजकीय प्रवास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर कार्यकर्त्यांबरोबरच आपल्याला आणि सर्व नातेवाईकांना मित्रमंडळी आणि रानडे परिवारालाही अत्यानंद झाला असल्याचं, फडणवीसांचे सासरे डॉ. शरद रानडे म्हणाले.
जावई तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर सासरे डॉ.शरद रानडेंनी दिली खास प्रतिक्रिया; देवेंद्र फडणवीस CM झाल्याने आता…
शेतकऱ्यांचे, सामान्य जनतेचे प्रश्न सोडवता येतील, अनेक राहिलेली कामे ही देवेंद्रजींना पूर्ण करता येतील, अशा शब्दात डॉ. शरद रानडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जी कामे हातातून पूर्णपणे गेली आहेत, त्यासाठी ती कामं पुन्हा नव्याने मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि हे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्कीच सगळ्यांच्या सहकार्याने पूर्ण करतील, असाही विश्वास डॉ. शरद रानडे यांनी व्यक्त केला.