• Sun. Aug 16th, 2026
नव्या सरकारच्या शपथविधीनंतर मोठी अपडेट! विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाची तारीख ठरली

Maharashtra Legislature Special Session on 7th: शपथविधी पार पडताच सरकारच्या कामकाजाचा श्रीगणेशा देखील झाला आहे. राज्याचे नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आता विधीमंडळाचं अधिवेशन बोलावण्यात आले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : राज्यात आता महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. भाजप प्रणित महायुतीचे तीन चाकी सरकार राज्यकारभार हाकणार आहे. गेल्या १२ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सरकार स्थापन झाले असून आता घडामोडींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शपथविधी पार पडताच सरकारच्या कामकाजाचा श्रीगणेशा देखील झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तीनही नेते मंत्रालयात पोहोचले. यावेळी महायुतीच्या तिन्ही प्रमुखांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली आहे. या बैठकीत कोणते निर्णय घेतले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर राज्याचे नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आता विधीमंडळाचं अधिवेशन बोलावण्यात आले आहे. येत्या ७ डिसेंबरला विधीमंडळाचं विशेष अधिवेशन पार पडणार आहे.

७ डिसेंबरला होणाऱ्या अधिवेशनासाठी विधानभवनात लगबग सुरु झाली आहे. विधिमंडळ सचिवालयाकडून कर्मचाऱ्यांना याबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या विशेष अधिवेशनात राज्याच्या नव्या सरकारच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमासाठी अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांचा असणार आहे. या अधिवेशनानंतर दोन आठवड्यांतच नागपूर हिवाळी अधिवेशन बोलावले जाणार असल्याची माहिती आहे.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

रश्मी शुक्लांना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा, मिलिंद नार्वेकरांचं ट्वीट चर्चेत, ठाकरेंच्या विश्वासू नेत्याने पुन्हा बुचकळ्यात टाकलं
Devendra Fadnavis : ‘महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन’, स्वातंत्र्यदिनामित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रतिपादन, नेमकं काय म्हणाले?
‘लेक लाडकी’ योजनेची अर्जप्रक्रिया सुलभ, 18 वर्षात 1 लाख 1 हजाराचा लाभ, ऑनलाईन फॉर्मबाबत आदिती तटकरेंची माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed