• Wed. Mar 11th, 2026

    पराभवाची कारणं सांगत जबाबदारी स्वीकारली, मी कुठेतरी कमी पडले म्हणत थोरातांची लेक स्पष्ट बोलली

    पराभवाची कारणं सांगत जबाबदारी स्वीकारली, मी कुठेतरी कमी पडले म्हणत थोरातांची लेक स्पष्ट बोलली

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Dec 2024, 9:39 pm

    ८ निवडणुका आणि तब्बल ४० वर्षांपासून बाळासाहेब थोरात संगमनेर मतदारसंघातून निवडून येत होते. मात्र, या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या (शिंदे गट) अमोल खताळ यांनी थोरातांचा….१० हजार ५६० मतांनी पराभव केला आणि ते राज्याच्या राजकारणातील जायंट किलर ठरले. दरम्यान या पराभवानंतर बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्ता संवाद मेळाव्यात संवाद साधला. या संवादानंतर बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला, पण मी कुठेतरी कमी पडले. एकप्रकारे कन्या जयश्री थोरात यांनी एक प्रकारे पराभवाची जबाबदारीच स्वीकारली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed