Eknath Shinde News: एकनाथ शिंदे हे दिलदार नेते आहेत. त्यांचा मान राखला गेला पाहिजे, असं वक्तव्य शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी केलं आहे. तसेच, मुख्यमंत्री हे फडणवीस होतील याची शक्यता ९९ टक्के असल्याचंही ते म्हणाले.
हायलाइट्स:
- राज्यात मुख्यमंत्रिपदावरुन तिढा कायम
- एकनाथ शिंदेंचा मान राखला जावा
- दीपक केसरकर यांची मागणी
अद्याप मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा नाही
महायुतीच्या मंत्रिमंडळाबाबत अजूनही निर्णय झालेला दिसत नाही. अनक बड्या विभागांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, असं एकंदरीत चित्र दिसत आहे. कारण, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाकडून गृह खात्यासह तीन मोठ्या मंत्रिपदांची मागणी केली जात असून, त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
Maharashtra CM: फडणवीस नाही तर रवींद्र चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री? दिल्लीत चाललंय काय? तावडे-शाहांमध्ये बैठक
महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरुन जो तिढा निर्माण झाला आहे, त्याबाबत शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी आपली प्रतिक्रिया दली आहे. “काहीही झालं तरी सरकार स्थापन होत आहे. शपथविधी सोहळा ५ डिसेंबरला निश्चित करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्यात सरकार स्थापन होत नाहीये, हे म्हणणं चुकीचं आहे. भाजपने आज निरीक्षकांची नियुक्ती केली आहे, त्यामुळे लवकरच मुख्यमंत्रिपदाची घोषणा केली जाईल”, असं केसरकर म्हणाले.
Eknath Shinde: एकनाथ शिंदे दिलदार नेते, त्यांचा मान राखावा, सेनेच्या नेत्याची मागणी, महायुतीतील तिढा सुटणार?
पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचा निर्णय अंतिम असेल, हे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. गृहखातं हे एकट्या गृहमंत्र्यांना चालवता येत नाही. हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री संयुक्तपणे चालवतात. राज्यांमध्ये गृहखात्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याची ९९ टक्के शक्यता आहे. एकनाथ शिंदे हे दिलदार नेते आहेत, त्यांचा मान राखायला हवा, असंही केसरकर म्हणाले.