Jalgaon News: जळगावमध्ये एका दाम्पत्यासोबत दुर्दैवी घटना घडली आहे. ४ डिसेंबरला आयोजित नातेवाईकाच्या विवाहसोहळ्यासाठी जळगावच्या दिशेने येणाऱ्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला आहे.
पारोळा तालुक्यातील म्हसवे गावाजवळील लोणी गावानजीकच्या वळणावर भरधाव वेगाने येणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली आणि भीषण अपघात घडला. यामध्ये कारमधील दाम्पत्य जागीच ठार झाले आहेत. सोमवारी २ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. सुधीर देवीदास पाटील, ४८ वर्षे आणि त्यांची पत्नी ज्योती सुधीर पाटील, ४४ वर्षे या दोघांचा दुर्दैवी अंत झाला आहे.
Crime News : गोणीत बॉडी, कपाळावर टिका… तीन दिवसांपासून बेपत्ता मुलासोबत काय घडलं? पोलिसांना वेगळाच संशय
पारोळा तालुक्यातील लोणी गावातील रहिवाशी असलेले सुधीर पाटील हे आपल्या पत्नी ज्योती पाटील यांच्यासह गुजरात राज्यात वास्तव्यास होते. दरम्यान, लोणी गावातील नातेवाईकाचे ४ डिसेंबर रोजी लग्न असल्याने पाटील दाम्पत्य हे आपल्या मुळगावी येण्यासाठी गुजरातहून रवाना झाले होते. दरम्यान सोमवारी सायंकाळी पारोळा तालुक्यातील म्हसवे गावातील फाट्याजवळ सुधीर पाटील हे राष्ट्रीय महामार्गावर आपली कार वळवण्याच्या बेतात असताना महामार्गावरील धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ऑडीने पाटील यांच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत पाटील दाम्पत्य जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की, पाटील यांच्या कारचा पुर्णपणे चुराडा झाला आहे. तर ऑडी कारमधील जखमींना तातडीने एरंडोल ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले आहे.