Chhatrapati Sambhajinagar News: जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणी आणि लागवड सुरू आहे. जिल्ह्याचे सरासरी रब्बी क्षेत्र एक लाख ९० हजार हेक्टर असून आतापर्यंत एक लाख दहा हजार हेक्टवर पेरणी झाली आहे.
जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणी आणि लागवड सुरू आहे. जिल्ह्याचे सरासरी रब्बी क्षेत्र एक लाख ९० हजार हेक्टर असून आतापर्यंत एक लाख दहा हजार हेक्टवर पेरणी झाली आहे. हरभरा पिकाचे सरासरी क्षेत्र ५२ हजार ८६६ हेक्टर असून २५ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. गव्हाचे क्षेत्र ७० हजार हेक्टर असून ३५ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. रब्बी ज्वारीचे क्षेत्र ४६ हजार असून २५ हजार हेक्टवर पेरणी झाली आहे. तुलनेने मक्याचे क्षेत्र घटले आहे. आतापर्यंत १८ हजार हेक्टरपैकी १३ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.
Aditya Thackeray: हा तर ‘लाडक्या’ आयोगाचा अपमान; सत्तास्थापनेचा दावा न केल्याने आदित्य ठाकरेंचा टोला
रब्बी हंगामासाठी सिंचनाची सोय आहे. मोठ्या धरणातून जास्तीचे आवर्तन सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. त्यामुळे डिसेंबर मध्यापर्यंत रब्बीची लागवड सुरू राहण्याची शक्यता आहे. उशिरा पेरणी केल्यास उत्पादन घटते. मात्र, पिकावर परिणाम होत नाही, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, यावर्षीही गळीत पिकाचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात गळीताचे सरासरी क्षेत्र ४५४ हेक्टर आहे. करडई, जवस, सूर्यफूल, तीळ या पिकांचे क्षेत्र कमी आहे. अद्याप पेरणी झाली नसल्याने मोठी घट दिसत आहे. गळीत पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभाग सातत्याने प्रयत्न करीत आहे.
गृहखात्यासाठी मोर्चेबांधणी; शिवसेनेची अपेक्षा, सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग येणार
पिकाचा फेरपालट करावा
जिल्ह्यात तूर पिकासाठी वाव असून शेतकरी तूर पिकाकडे वळत आहेत. शेतकऱ्यांनी कापूस पिकानंतर येत्या खरीप हंगामात तूर पिकाचा विचार करावा. तूर उत्पादक शेतकऱ्यांनी आपला अनुभव इतर शेतकऱ्यांना सांगितल्यास तूर क्षेत्र वाढेल, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे रामेश्वर ठोंबरे यांनी केले. पैठण तालुक्यातील रांजणगाव खुरी येथील शेतकरी महेश गरड यांच्या शेतातील ‘गोदावरी’ या तूर वाणाची पाहणी करुन ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कृषिभूषण पांडुरंग इनामे, विष्णू लघाने, विवेकानंद कुलकर्णी, विकास ढगे आदी उपस्थित होते.