• Thu. Dec 26th, 2024
    ऑईल मीलमध्ये अचानक स्फोट, आगीचा भडका उडाला; भीषण आगीत कामगार होरपळले

    Oil Mill Caught Fire In Nanded : शहरातील ऑईल मीलला भीषण आग लागली आहे. मीलमध्ये स्फोट झाल्यानंतर आगीचा भडला उडाला होता. या भीषण आगीत काही कामगार होरपळले आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    अर्जुन राठोड, नांदेड : नांदेड शहरालगत असलेल्या सिडको एमआयडीसी भागातील एका आँईल मीलमध्ये स्फोट झाला आहे. स्फोट झाल्यानंतर मिलमध्ये भीषण आग लागली आहे. या आगीच्या घटनेत मीलमध्ये काम करत असलेल्या कारखाना मालकासह पाच जण गंभीररित्या भाजले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जखमींना तात्काळ शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल कारण्यात आलं आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे.
    Pune Crime : लिव्ह-इन पार्टनरला संपवलं, १३० किमी दूर खंडाळ्यात फेकलं; नंतर रचलेल्या बनावाने पोलिसही हैराण, पुण्यात काय घडलं?
    नांदेड – उस्मानगर रस्त्याजवळ सिडको औद्योगिक वसाहतीमध्ये तिरुमला ऑईल मिल आहे. रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मीलमध्ये मजूर काम करत होते. यावेळी ऑईल मिलमध्ये अचानक स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. स्फोट झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ मीलमधून बाहेर येत होते. परिसरातील नागरिकांनी तत्काळ मीलकडे धाव घेऊन अग्निशमन दलाला या आगीबाबत माहिती दिली.
    Crime News : शेजाऱ्यांमध्ये वाद टोकाला, घरात घुसून थेट ९ महिन्यांच्या बाळावर कुऱ्हाडीने वार; घटनेने खळबळ
    घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालं. अग्निशामक दल पथकाच्या तीन गाड्या दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू करण्यात आलं. त्यानंतर काही वेळाने अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. रविवारी कंपनीला सुट्टी असल्याने अनेक कामगार कामावर आले नव्हते. मात्र काही जण काम करत होते.
    पत्नी बाहेरुन आली, पतीला समोर पाहताच हंबरडा फोडला; चिठ्ठी लिहून शिक्षकाने उचललं टोकाचं पाऊल
    कंपनीचे मालक भास्कर कोतावार, सुमत बंडेवार, हर्षद कोतावार, सुधाकर बंडेवार, विनोद कोतावार हे पाच जण कंपनीत काम करत होते. हे पाचही जण भीषण आगीत होरपळले गेले आहेत. त्यांना तात्काळ बाहेर काढून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आगीत तिरुमला कंपनीच्या तृप्ती ऑईल या नावाने चालणाऱ्या ऑईलचं मोठं नुकसान झालं आहे. तसंच टेप्पा क्र (एम.एच. २६ सी. एच. ०७००) हा जळून खाक झाला आहे. एकूण किती रूपयांचे नुकसान झाले याची अद्याप माहिती नाही. तसंच आगीचे कारणही स्पष्ट झालेलं नाही.

    Nanded News : ऑईल मीलमध्ये अचानक स्फोट, आगीचा भडका उडाला; भीषण आगीत कामगार होरपळले

    दरम्यान, या आगीच्या घटनेनंतर आमदार आनंद बोढारकर यांनी घटनास्थळी भेट दिली. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर खासदार रविंद्र चव्हाण यांनी देखील रुग्णालयात जावून जखमींची विचारपूस केली.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed