Solapur Mahesh Kothe On Recounting : शरद पवारांच्या उमेदवाराने फेरमतमोजणीसाठी पैसे भरले असून त्यांनी दोन ईव्हीएम मशीनमधील आकडेवारीवर संशय व्यक्त केला आहे. त्यांनी फेर मतमोजणीसाठी तब्बल १० लाख रुपये भरलं असल्याचं सांगत भाजपवर निशाणा साधला आहे.
विधानसभा निवडणुकीदरम्यान EVM हॅक झाल्याचा दावा, व्हायरल व्हिडिओनंतर मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई
आमदार होण्यासाठी दहा हजार डिपॉझिट, फेर मतमोजणीसाठी मात्र दहा लाख –
सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील दोन मतदान केंद्रातील दोन मशिनची पडताळणी करण्यात यावी असा अर्ज करत महेश कोठेंनी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज दाखल केला आहे. या पडताळणीसाठी ९४ हजार ४०० रुपयांचे चलनही त्यांनी भरले आहे. सोलापुरात पराभूत उमेदवारापैकी तुतारीचे उमेदवार महेश कोठेनी अर्ज भरून रोख रक्कम ही भरली आहे. आमदार होण्यासाठी अर्ज भरताना १० हजार रुपये डिपॉझिट प्रशासन घेतंय, मात्र फेर मतमोजणीसाठी एका ईव्हीएम मशीनसाठी ४० हजार आणि जीएसटी घेतला जात आहे. म्हणजे फेर मतमोजणीसाठी जवळपास दहा लाख रुपये भरावे लागत आहेत. हा कुठला न्याय? असा सवाल महेश कोठे यांनी उपस्थित केला आहे.
माझी तब्येत बरी आहे, मी गावाला यायचं नाही का? CM पदाबाबत शिंदे म्हणाले- मुख्यमंत्री व्हावं अशी…
भाजपचे विजयकुमार देशमुख सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून विजयी –
सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे विजयकुमार देशमुख यांना १ लाख १७ हजार २१५ एवढी मते मिळाली आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांना ६२ हजार ६३२ एवढी मते मिळाली आहेत. सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात वापरण्यात आलेल्या मशिन योग्य होत्या की नाही? याचीही खातरजमा यातून केली जाणार आहे.
शिंदेंच्या शिलेदाराचा विधानसभेत निसटता पराभव, जरांगेना भिडणारा माजी आमदार म्हणतो – मी वाघासारखा खंबीर
दोन ईव्हीएम मशीन मधील मतमोजणी कशी होणार?
दाखल झालेल्या अर्जावर ४५ दिवसानंतर कार्यवाही केली जाणार आहे. महेश कोठे यांनी पुढे बोलताना माहिती दिली, की मी ज्या दोन मशीनवर संशय व्यक्त केला आहे, त्याची फेरमतमोजणी होणार नाही. निवडणूक अधिकारी दोन्ही मशीनवर दहा दहा वेळा बटन दाबून तपासणी करणार, मशीन खराब नव्हती एवढंच पाहिले जाणार आहे, अशी कशी फेरमतमोजणी, अशी संतप्त प्रतिक्रिया महेश कोठेंनी व्यक्त केली आहे.
नामांकन अर्जासाठी १० हजार डिपॉझिट, फेर मतमोजणीसाठी १० लाख, हा कुठला न्याय? शरद पवारांच्या शिलेदाराचा सवाल
… तर तुमच्या हातात एकहाती सत्ता देऊन आम्ही राजकारणतून मोकळे होतो –
ईव्हीएमवर निवडणूका घेण्याचा ठाम निर्णय भाजपचा असेल तर, निवडणूका कशाला घेता. आम्ही राजकारणपासून मोकळे होतो, एक हाती सत्ता भाजपच्या हातात देतो. इतक्या वर्षांपासून आम्ही विकास कामे करून सुद्धा लोकं आम्हाला मतदान करत नसतील, तर आम्ही निवडणुका लढवणार नाही, असे महेश कोठेंनी जाहीरपणे सांगितले आहे.