Mumbai News : मुंबईमध्ये शनिवारी एक दुर्दैवी घटना घडली आहे. कुर्ला बेस्ट आगारामध्ये सुरू असलेल्या विकासकामांनी एका चिमुकल्याच्या बळी घेतला आहे. इमारत उभारण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.
मृत मुलाचे नाव उज्ज्वल रवी सिंग असून तो वत्सला ताई नाईक नगर येथे वास्तव्यास होता. आज दुपारच्या सुमारास त्याच्या मित्रांसह कुर्ला आगाराच्या आत खुल्या जागेत खेळण्यास गेला होता. त्याठिकाणी इमारतीचे बांधकाम सुरु होते. यासाठी इमारतीच्या पायाभरणीसाठी खड्डा खोदण्यात आला होता, जो खड्डा पुर्ण पाण्याने भरला होता. खेळता खेळता त्याचा तोल जाऊन उज्ज्वल त्या खड्ड्यात पडला. त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी एकच आरडाओरडा सुरु केली. मुलांचा आवाज ऐकून तिथे असलेल्या काही वाहनचालक तेथे जमले आणि उज्ज्वलला खड्ड्यातून बाहेर काढले. त्याला त्यांनी तात्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
Crime News : शेजाऱ्यांमध्ये वाद टोकाला, घरात घुसून थेट ९ महिन्यांच्या बाळावर कुऱ्हाडीने वार; घटनेने खळबळ
सदर घटनेची माहिती मिळताच नेहरू नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी याबाबत अपमृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान या घटनेमुळे चिमुकल्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डौंगर कोसळला आहे. तर शहरातील विकासकामांच्या क्षेत्रातील सुरक्षिततेवर यानिमित्ताने प्रश्न उपस्थित केला जात आहे.