• Sat. Nov 30th, 2024
    दिग्गज नेत्यांना पराभव अपचणीय, पुण्यातील ‘या’ ११ नेत्यांची फेर मतमोजणीची मागणी, शुल्कही भरला

    Pune Leaders Demand Recount of Votes: हडपसर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिरूर राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक बापू पवार, काँग्रेसचे पुणे कॅन्टोन्मेंटचे उमेदवार रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे खडवासलाचे उमेदवार सचिन दोडके या वरिष्ठ नेत्यांनी फेर मतमोजणीची मागणी केली आहे.

    हायलाइट्स:

    • ईव्हीएमची होणार फेर मतमोजणी मागणी
    • पुणे जिल्ह्यातील ११ उमेदवारांनी भरले अर्ज
    • एव्हीएम पडताळणीसाठी पैसे भरून अर्ज केला आहे
    Lipi
    फेर मतमोजणी बातम्या

    आदित्य भवार, पुणे : विधानसभा निवडणुकीत महायुती अभूतपूर्व यश मिळालं, महायुतीचे सर्व मिळून २३० उमेदवार निवडून आले आहेत. तर महाविकास आघाडीचे दिग्गज उमेदवार पराभूत झाले आहेत. निवडणुकीत आलेले निकाल हे अपचणीय आहेत. अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून दिली जात आहे. तसेच पराभवच सगळं खापर हे ईव्हीएम मशीनवर फोडलं जात आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशीन मॅनेज केल्याचा आरोप वरिष्ठ नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. याची पूर्ण तपासणी व्हावी अशी अपेक्षा काही पराभूत नेत्यांची आहे. त्यामुळे मत फेरमोजणीसाठी जिल्ह्यातील ११ उमेदवारांनी एव्हीएम पडताळणीसाठी पैसे भरून अर्ज केला आहे.हडपसर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिरूर राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक बापू पवार, काँग्रेसचे पुणे कॅन्टोन्मेंटचे उमेदवार रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे खडवासलाचे उमेदवार सचिन दोडके या वरिष्ठ नेत्यांनी फेर मतमोजणीची मागणी केली आहे.
    Gondia Bus Accident: ‘शिवशाही’ बस उलटून गोंदियात भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढला; उपस्थितांचे डोळे पाणावले

    मतदान यंत्राच्या पडताळणीसाठी निवडणूक आयोगाकडून स्वतंत्रपणे तारीख आणि वेळ निश्चित करून दिली जाणार आहे. आयोगाच्या निर्देशानुसार ज्या मतदान यंत्राची पडताळणी करायची आहे. त्या यंत्राची निवड करण्याचा अधिकार संबंधित अर्जदार उमेदवाराला आहे. ज्या मतदान केंद्रावर आणि मतदान यंत्राची निवड उमेदवाराने केली आहे त्या यंत्रामधील संपूर्ण मतांचा डेटा मिटवला जाईल. त्यानंतर त्याच मतदान यंत्रावर चिन्हाचे बटण एकूण बाराशे वेळा दाबून त्या बटणांचे एकूण मतदान मोजले जाईल. प्रत्येक यंत्रासाठी फेर पडताळणी करताना ही प्रक्रिया अवलंबली जाणार आहे.

    प्रामुख्याने मतदान केंद्रवर पडलेली मत आणि प्रत्यक्षात पडलेला मतांमध्ये मोठी तफावत असल्याचा संशय या उमेदवारांना आहे. या शंकेचे निराकरण करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार त्यांनी एकूण मतदान केंद्राच्या किंवा मतदान यंत्र संख्येच्या पाच टक्के या प्रमाणामध्ये मतदान यंत्रांची पडताळणी करून घेण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. मतदान यंत्र पडताळणीसाठी प्रत्येकी शुल्क आणि त्यावर जीएसटी असे एकूण ४७ हजार रुपये प्रति यंत्र याप्रमाणे त्यांनी शुल्क जमा केले आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed