बीडच्या परळी शहरात फिजिशियन डॉक्टर यशवंत देशमुख यांच्याकडे तपासणीसाठी गेलेल्या तरुणीची छेड काढल्याचा आरोप आहे. तरुणीच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून मोठ्या संख्येने जमाव परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर जमला होता. या घटनेनंतर लोकांमध्ये संताप बघायला मिळाला.
परळी शहरातील डॉक्टर यशवंत देशमुख यांचे जनरल फिजिशियन हॉस्पिटल आहे. याच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप तरुणीने केला. पीडित तरुणीला न्याय मिळावा. याकरिता मोठ्या संख्येने लोक पोलिस स्टेशनबाहेर जमले होते. यानंतर पोलिसांकडून डॉक्टर यशवंत देशमुखवर गुन्हा दाखल करण्यात आला. आता याच पार्श्वभूमीवर आज परळी बंदची हाक देखील देण्यात आलीये.
मुंबईत मद्यधुंद अवस्थेत कारचालकाचा गोंधळ, पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न, बॅरिकेड्स तोडले, काही वाहनांना धडकडॉक्टर यशवंत देशमुख यांच्या विरोधात कलम 74,75( 2) 79,3,1, नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. आज परळी बंदची हाक नागरिकांकडून देण्यात आली असून नागरिकांनी शांतता अबाधित ठेवावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय. या घटनेचा निषेध म्हणून आज परळी शहर बंदची हाक देण्यात आली आहे. यामध्ये स्थानिक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
डॉक्टर यशवंत देशमुख यांच्या रूग्णालयात तरुणीची छेड काढण्याचा प्रकार कळताच लोकांना धक्का बसला. ही तरुणी डॉक्टरांकडून तपासणीसाठी गेली होती, तेव्हाच हा प्रकार घडला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जातोय. मात्र, तरुणीची छेडछाडीबद्दल कळताच नागरिकांनी पोलिस स्टेशनकडे मोठ्या प्रमाणात धाव घेतली. शेवटी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.