• Fri. Nov 29th, 2024
    एकनाथ शिंदेंनी गाठलं दरेगाव, शिवसेना नेत्याने सांगितलं कारण; वाचा काय म्हणाले?

    Uday Samant on Eknath Shinde Daregaon Stay: सरकार स्थापनेसाठी चर्चेचे गुऱ्हाळ सुरु आहे. अशातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा येथे दरे गावात पोहोचले आहेत. यावरून शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

    Lipi

    प्रसाद रानडे, रत्नागिरी : महाराष्ट्रात महायुतीला जनतेने मोठा कौल दिला आहे. मात्र अद्याप सरकार स्थापनेसाठी चर्चेचे गुऱ्हाळ सुरु आहे. अशातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा येथे दरे गावात पोहोचले आहेत. यावरून शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ताप आहे, त्यांना सर्दी देखील झाली आहे. ते कुठेही नाराज नाहीत. गावाला ते विश्रांतीसाठी गेले आहेत. याचा अर्थ ते नाराज आहेत, असा काढणे हे चुकीचे ठरेल, असे उदय सामंत म्हणाले आहेत.

    महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा अवघ्या राज्यात सुरू झाल्या आहे. एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता पाहता तेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशी अटकळ सामान्य महिलावर्ग व जनतेकडून बांधली जात आहे. दुसरीकडे भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील अशीही अटकळ बांधली जात आहे. मात्र भाजपचे दिल्लीतील हायकमांड मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत धक्कातंत्र वापरण्याची शक्यता आहे.
    तीन दिवस लगबग, ‘वर्षा’वर लक्षवेधी हालचाली; अखेर त्यांना अश्रू अनावर, शिंदे निघताच ढसाढसा रडले
    राज्यात मराठा फॅक्टर हा महत्त्वाचा असताना महायुतीकडून देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत असलेले नाव निश्चित न करता भाजपचे हायकमांड धक्कातंत्राचा वापर करु शकतात. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता पाहता त्यांनाच पुन्हा महायुतीने संधी द्यावी, अशाही प्रतिक्रिया सामान्य जनतेतून तसेच राजकीय वर्तुळातून उमटत आहेत. त्यामुळे आता महायुतीचे दिल्ली येथील हायकमांड नेमका कोणता निर्णय घेतंय, याकडे राज्यासोबतच देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

    या सर्वादरम्यान मुंबईतील महायुतीची बैठक रद्द करत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या सातारा जिल्ह्यातील दरेगावात पोहोचले आहेत. अशातच शिंदे नाराज आहेत अशा चर्चा सुरू आहेत. यावरून बोलताना शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, शिंदे नाराज नाहीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी नाही. त्यांना ताप देखील होता त्यांना सर्दी देखील झाली आहे. असे असताना ते नाराज आहेत म्हणून दरे गावाला गेले, असे सांगणे हे चुकीचे ठरू शकते, अशी प्रतिक्रिया सामंत यांनी दिली आहे. ते चांगल्या वातावरणात गावाकडे गेले असतील तर त्याचा अर्थ ते नाराज होऊन गेले किंवा नाराज न होता याचा अर्थ काढणे चुकीचे आहे, असे मोठे वक्तव्य सामंत यांनी केले आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed