Temple Gold Ornaments Theft: बुधवारी सकाळी सात वाजेच्या दरम्यान सचिन बोंबले हे मंदिराचे कुलूप उघडण्यासाठी आले होते. त्यांना मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार उघडे दिसले. त्यांनी आतमध्ये जाऊन बघितले असता, या ठिकाणी दानपेटी फुटलेल्या अवस्थेत होती.
या प्रकरणी मंदिराच्या परिसरात अभ्यासिका चालविणारे सचिन बोंबले (वय ४४, रा. एन १२, सिडको) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी सकाळी सात वाजेच्या दरम्यान सचिन बोंबले हे मंदिराचे कुलूप उघडण्यासाठी आले होते. त्यांना मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार उघडे दिसले. त्यांनी आतमध्ये जाऊन बघितले असता, या ठिकाणी दानपेटी फुटलेल्या अवस्थेत होती. देवीचा चांदीचा मुकुट, देवीच्या अंगावरील दागिनेही गायब होते. या घटनेबाबत सचिन बोंबले यांनी तत्काळ सिडको पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच, सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव सह अन्य पोलिस कर्मचारी घटना स्थळी पोहोचले. त्यांनी घटनेची पाहणी केली.
चिंताजनक! दररोज १४० महिलांचा कौटुंबिक छळाने मृत्यू; संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांचे धक्कादायक निरीक्षण
या मंदिराच्या आवारातून दानपेटीतील अंदाजे आठ हजार रुपये, मूर्तीवर असलेली पाच ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, चांदीचा मुकुट, पंचधातूचे कासव, गदा, तलवार, त्रिसूळ, चक्र असा ७३ हजारांचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हिंगलाज देवीच्या मंदिरात झालेली ही चोरी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान करण्यात आल्याचीही माहिती समोर आली. या प्रकरणी सचिन बोंबले यांच्या तक्रारीवरून हिंगलाज माता मंदिरात झालेल्या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देशापेक्षा धर्म मोठा नको; संविधान दिन कार्यक्रमात उपराष्ट्रपती धनखड यांचे प्रतिपादन
श्वान पथकाकडून चोरट्यांचा माग
सिडकोच्या हिंगलाज माता मंदिरात चोरी झाल्याची माहिती मिळाताच, पोलिस निरिक्षक सोमनाथ जाधव हे पोहोचले. यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना परिसारातील सिसीटिव्ही वरून चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले. याशिवाय श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. या ठसे तज्ज्ञांनी चोरटयांने सोडलेल्या वस्तुंवरून ठसे घेण्याचा प्रयत्न सुरू केला. तर श्वान पथकाकडूनही चोरटयांचा माग काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले.