Kalyan Vertex Building Fire News : कल्याणमध्ये गगनचुंबी व्हर्टेक्स या इमारतीला भीषण आग लागली. इमारतीतील १५व्या मजल्यावर ही आग लागली. मात्र या आगीमुळे १६ आणि १७ मजल्यावरील घरांचं मोठं नुकसान झालं आहे.
मुंबईकरांची चिंता वाढली! वायू प्रदूषण धोकादायक स्तरावर; या भागात सर्वात खराब हवा, तज्ज्ञांनी कारणही सांगितलं
उंच इमारतीमधील आग विझवण्यासाठी केडीएमसीकडून ५५ मीटर लांबीची शिडी असलेली अद्यावत गाडी घेण्यात आली होती, मात्र ही गाडी बंद असल्याने आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागला मोठी कसरत करावी लागली. तर अग्निशमन दलाच्या गाड्या उशिराने आल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. यामुळे केडीएमसीची अग्निशमन यंत्रणा कुचकामी ठरली असल्याचे दिसून आले.
Kalyan News : ४२ दिवसांच्या बाळासोबत भयंकर कृत्य, पण पोलिसांमुळे थोडक्यात टळला अनर्थ; कल्याणमधील धक्कादायक घटना
कल्याण – डोंबिवली मनपा आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी घटनास्थळी पोहचत परिस्थितीची माहिती घेतली. तसंच ५५ मीटर शिडी असलेली अग्निशमन गाडी तांत्रिक बिघाडामुळे कार्यान्वित नसल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे ठाणे मनपाकडून गँल्डर अग्निशमन गाडी पाचरण करण्यात आली. पोलीस प्रशासन आणि आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. इमारतीतील रहिवाशांना सुखरुपपणे बाहेर काढलं असल्याचे आयुक्तांनी सांगितले. याआगीच्या घटनास्थळी मनपा आधिकारी कर्मचारी असा मोठा फौजफाटा उपस्थित होता.
नरिमन पॉईंट ते विरार दीड तासांचा प्रवास ३५ मिनिटांत होणार, कसा असेल मार्ग? कधी सुरू होणार?
Kalyan News : कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीत अग्नितांडव, केडीएमसीची अग्निशमन यंत्रणा ठरली कुचकामी
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना तब्बल ३ तासानंतर आग विझवण्यात यश आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी कुलिंग ऑपरेशन सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यानिमित्ताने कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील इमारतीमधील फायर फायटिंग यंत्रणेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने आता डोळस भूमिका घेत अति जुन्या उंच इमारतीमधील फायर फायटिंग यंत्रणा अपडेट कशी होईल याबाबत अमंलबजावणी केली पाहिजे अशी चर्चा होताना दिसते आहे.