८ निवडणुका आणि तब्बल ४० वर्षांपासून बाळासाहेब थोरात संगमनेर मतदारसंघातून निवडून येत होते. मात्र, या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या (शिंदे गट) अमोल खताळ यांनी थोरातांचा….१० हजार ५६० मतांनी पराभव केला आणि ते राज्याच्या राजकारणातील जायंट किलर ठरले. अमोल खताळ यांना १ लाख १२ हजार ३८६ मते मिळाली.तर बाळासाहेब थोरात यांना १ लाख १ हजार ८२६ मते मिळाली.१९६२ पासून संगमनेर मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व राहिलं आहे. आता अमोल खताळ यांनी आमदार होताच अजित पवार यांची आज भेट घेतली. भेटीनंतर अमोल खताळ यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.