Maharashtra Election Result: लोकसभेला मुसंडी मारणाऱ्या महाविकास आघाडीचं विधानसभेला पानीपत झालं. शिवसेना उबाठाला २०, काँग्रेसला १६, तर राष्ट्रवादी शपला १० जागा मिळाल्या.
लोकसभेला मुसंडी मारणाऱ्या महाविकास आघाडीचं विधानसभेला पानीपत झालं. शिवसेना उबाठाला २०, काँग्रेसला १६, तर राष्ट्रवादी शपला १० जागा मिळाल्या. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्रिपदावरुन भांडणाऱ्या महाविकास आघाडीला ५० चा आकडादेखील गाठता आलेला नाही. महाविकास आघाडीतील एकाही पक्षाला २९ चा आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे आता मविआला ‘मावळणकर रुल’चा फटका बसेल. १५ व्या विधानसभेत विरोधी पक्षनेता नसेल.
आपली १ जागा वाढलीय! मोदींकडून भाषणात खास उल्लेख; काही मिनिटांत तिकडे भाजपचा पराभव
मावळणकर रुल काय सांगतो?
दिवंगत गणेश माळवणकर स्वातंत्र्योत्तर काळात बडोद्यातून निवडून गेले आणि लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले. त्यावेळी काँग्रेसकडे बहुमत होतं. विरोधी पक्षाकडे दहा टक्केसुद्धा जागा नव्हत्या. त्यावेळी मावळणकर यांनी सभापती पदाच्या खुर्चीतून एक महत्त्वाचा नियम सांगितला. ‘विरोधी पक्ष म्हणून पुरेसं प्रतिनिधित्व असणं आवश्यक आहे अन्यथा त्या पदाला अर्थ राहणार नाही. म्हणून यापुढे जर सत्तेत नसलेल्या सर्वात मोठ्या पक्षाला एकूण लोकसभेतील जागांपेक्षा १०% पेक्षा अधिक जागा मिळाल्या नाहीत तर संसदेत/लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद (व पक्ष म्हणून मान्यता) असणार नाही,’ असं मावळणकर यांनी सांगितलं.
महाराष्ट्र असं केवळ सहावं राज्य, जिथे…; पीएम मोदींनी सांगितलं महायुतीच्या विजयाचं महत्त्व
गणेश वासुदेव मावळणकरांनी जो संकेत त्या दिवशी खुर्चीत बसून घालून दिला, तो मावळणकर रुल म्हणून प्रसिद्ध झाला. हा नियम आजतागायत अस्तित्त्वात आहे. या नियमाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या. पण सर्वोच्च न्यायानं नियमात कोणताही बदल केला नाही. त्याला कायद्याइतकंच महत्त्व असल्याचा निकाल न्यायालयानं दिला.
महाराष्ट्राच्या विधानसभेत २८८ आमदार आहेत. २८८ च्या दहा टक्के म्हणजे एकूण २९ किंवा त्यापेक्षा अधिक इतक्या जागा सत्तेत नसलेल्या कोणत्याही एका पक्षाला मिळालेल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात कदाचित पहिल्यांदाच मावळणकर रूल लागू होईल आणि विरोधी पक्ष नेता विधानसभेत असणार नाही.