• Mon. Nov 25th, 2024
    एकनाथ शिंदेनी आपला शब्द खरा करुन दाखवला, निवडणूकीपूर्वी म्हणाले होते २०० आमदार आले नाही तर…

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचे निवडणूकीपूर्वीचे भाषण सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. एकनाथ शिंदे यांनी आपला शब्द खरा करून दाखवला आहे. एकनाथ शिंदे यांनी काय म्हटले होते, जाणून घ्या…

    हायलाइट्स:

    • एकनाथ शिंदे यांनी आपला शब्द खरा करून दाखवला
    • एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
    • एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय म्हटलं होतं, जाणून घ्या….
    महाराष्ट्र टाइम्स.कॉम
    सौजन्य-ट्विटर

    मुंबई : एकनाथ शिंदे यांनी आपले शब्द खरे करून दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक होण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत एक भाष्य केले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सर्वांना एक शब्द दिला होता. हा शब्द आता शिंदे यांनी खरा करून दाखवल्याचे समोर आले आहे.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांचे एक भाषण चांगलेच गाजले होते. या भाषणामध्ये एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणूकीत आम्ही किती जागा जिंकू, याबाबत भाष्य केले होते. जर आमच्या युतीचे जर २०० आमदार आले नाहीत, तर काय करणार हे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले होते.

    एकनाथ शिंदे निवडणूकीपूर्वी विधानसभेत म्हणाले होते की, ” आमच्या पक्षाचे ५० आमदार मी निवडून आणणार. त्यापेक्षा एकही आमदार कमी येऊ देणार नाही. त्याचबरोबर आमचे आणि भाजपाच्या मित्र पक्षाबरोबर आमचे २०० आमदार जिंकतील. हा माझा शब्द आहे. विधानसभेत मी हा सर्वांना शब्द देत आहे. जर आमचे आणि भाजपाचे मिळून २०० आमदार आले नाहीत, तर मी गावी शेती करायला जाईन. ” एकनाथ शिंदे यांचा हा व्हिडिओ त्यावेळी चांगलाच व्हायरल झाला होता. पण एकनाथ शिंदे यांनी आपला दिलेला शब्द हा खरा करून दाखवला आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ५० पेक्षा जास्त आमदार निवडून आले आहेत, तर भाजपा आणि मित्रपक्षाचे मिळून २०० पेक्षा जास्त आमदार आले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपला शब्द खरा करून दाखवल्याचे आता समोर आले आहे.

    एकनाथ शिंदेनी आपला शब्द खरा करुन दाखवला, निवडणूकीपूर्वी म्हणाले होते २०० आमदार आले नाही तर…

    एकनाथ शिंदे यांनी भाजपाबरोबर युती करत सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात बऱ्याच योजना सुरु करण्यात आल्या आहेत. यामधील लाडकी बहिण योजना ही चांगली गाजली. या योजनेनुळेच महाराष्ट्रात महिलांनी जास्त मतदान केल्याचे म्हटले जात आहे. आता महायुतीला बहुमत मिळाले आहे, पण मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता सर्वांना असणार आहे.

    प्रसाद लाड

    लेखकाबद्दलप्रसाद लाडप्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed