• Mon. Nov 25th, 2024
    Nana Patole wins Sakoli Election: साकोलीमध्ये भाजपवर काँग्रेस पडलं भारी; काट्याची टक्कर असताना नाना पटोलेंचा घसघशीत विजय, अविनाश ब्राम्हणकरांचा पराभव

    Congress Nana Patole wins Maharashtra Sakoli Vidhan Sabha Election 2024: साकोली येथून काँग्रेसचे नाना पटोले आणि भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांच्यात चुरशीची लढत असून, दोघांपैकी कोण जिंकणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    साकोली – साकोली विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील भंडारा जिल्ह्यात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. साकोली येथून महायुतीने भाजपचे अविनाश आनंदराव ब्राह्मणकर यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीने काँग्रेसचे नाना पटोले यांना उमेदवारी दिली आहे.

    २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे नाना पटोले यांना ४१.६३%मते मिळाली असून भाजपच्या परिणय रमेश फुके यांच्यावर ३८.९०% मते मिळवून विजय मिळवला. या वर्षी महाराष्ट्रात २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात निवडणूका झाल्या. त्यामुळे आता नाना पटोले आणि अविनाश ब्राह्मणकर यांच्यात कडवी लढत असल्यामुळे साकोली येथून कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार होतं.

    Nana Patole wins Sakoli Election: साकोलीमध्ये भाजपवर काँग्रेस पडलं भारी; काट्याची टक्कर असताना नाना पटोलेंचा घसघशीत विजय, अविनाश ब्राम्हणकरांचा पराभव

    काँग्रेसचे नाना पटोले आघाडीवर होते. नाना पटोले दुसऱ्या फेरीत ६८७ मतांनी आघाडीवर तर अविनाश ब्राह्मणकर पिछाडीवर. चौथ्या फेरीत नाना पटोले ४५१ मतांनी आघाडीवर. पाचव्या फेरीत नाना पटोले ३५९ मतांनी आघाडीवर. सहाव्या फेरीत नाना पटोले ३७२ मतांनी आघाडीवर. सातव्या फेरीत नाना पटोले ११७ मतांनी आघाडीवर. नाना पटोले आघाडीवर, आठव्या फेरीत ५४६ मतं. नाना पटोले नवव्या फेरीत २५८ मतांनी आघाडीवर होते.
    ५६ लाख फॉलोअर्स असूनही अभिनेत्याची नाचक्की; नोटा पेक्षाही कमी मतं, वर्सोवा मतदारसंघातून पराभव
    १० व्या फेरीत भाजपाचे अविनाश ब्राम्हणकर ४७६ मतांनी आघाडीवर. ११व्या फेरीत अविनाश ब्राह्मणकर ५३६ मतांनी आघाडीवर. १२ व्या फेरीत अविनाश ब्राह्मणकर ८७१ मतांनी आघाडीवर. १३ व्या फेरीत नाना पटोले ३२१ मतांनी आघाडीवर. चौदाव्या फेरीत नाना पटोले ४६९ मतांनी आघाडीवर. १५ व्या फेरीत नाना पटोले ५३५ मतांनी आघाडीवर. १६ व्या फेरीत पुन्हा नाना पटोले पिछाडीवर असून अविनाश ब्राह्मणकर १२३ मतांनी आघाडीवर होते. सतराव्या फेरीत अविनाश ब्राह्मणकर ९०४ मतांनी आघाडीवर आहेत. अठराव्या फेरीत नाना पटोले पुन्हा एकदा पिछाडीवर आणि अविनाश ब्राम्हणकर १५५५ मतांनी आघाडीवर असून १९ व्या फेरीत अविनाश ब्राम्हणकर २६४९ मतांनी आघाडीवर असताना २० व्या फेरीत अविनाश ३०२४ मतांनी आघाडीवर तर २१ व्या फेरीत अविनाश ब्राह्मणकर ३२४६ मतांनी आघाडीवर होते. त्यामुळे नाना पटोले आणि अविनाश यांच्यात चुरशीची टक्कर सुरू होता. २२व्या फेरीमध्ये अविनाश ब्राह्मणकर ३०७४ मतांनी आघाडीवर तर नाना पटोले पिछाडीवर होते. २३व्या फेरीतही अविनाश २७८९ मतांनी आघाडीवर असून २४ व्या फेरीतसुद्धा नाना पटोले पिछाडीवर होते तर अविनाश ब्राह्मणकर २१४३ मतांनी आघाडीवर होते. २५ व्या फेरीअंती अविनाश ब्राह्मणकर १६०७ मतांनी आघाडीवर, २६व्या फेरीत नाना पटोले ११६२ मतांनी पिछाडीवर तर २७व्या फेरीत ३३३ पिछाडीवर होते.
    रितेशचा झापुक झुपूक प्रचार, पण लातूर ग्रामीणमध्ये देशमुखांना मोठा धक्का; धीरज यांचा पराभव
    अशातच खेळी एकदमच पलटली आणि साकोली विधानसभा क्षेत्राचा विचार केला असता विद्यमान काँग्रेस नेते नाना पटोले यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणाऱ्या नाना पटोले यांचा २१२ मतांनी विजय झाला असून अविनाश ब्राम्हणकर यांचा पराभव झाला आहे.

    तेजश्री कुलये

    लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्न म्हणून कार्यरत आहे. मराठी साहित्यात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. मनोरंजनविषयक बातम्या लिहिण्याची आवड. वाचनाची आणि लिखाणाची आवड…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed