• Mon. Nov 25th, 2024
    Sangli MIDC Gas Leakage: सांगली MIDC मधील कंपनीत वायूगळती, दोन महिलांचा मृत्यू; शहरात खळबळ

    Sangali Kadegaon MIDC Gas Leakage: या गळतीमुळे अनेक लोक गंभीर झाले असून यातील ५ लोकांना कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही नागरिकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.

    हायलाइट्स:

    • सांगली MIDC मधील कंपनीत वायूगळती
    • उपाचारादरम्यान दोन महिलांचा मृत्यू
    • सांगली शहरात खळबळ
    महाराष्ट्र टाइम्स.कॉम
    सांगली कडेगाव एमआयडीसी कंपनी वायूगळती

    स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : कडेगाव तालुक्यातील शाळगावमधील MIDC मधील म्यानमार केमिकल कंपनीमधून मोठ्या प्रमाणावर वायूगळती झाल्याची माहिती समोर आली आहे. या विषारी वायूमुळे अनेक लोक गंभीर झाले असून यातील ५ लोकांना कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही नागरिकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. तर दोन महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अनेक जणांना या वायूची बाधा झाली आहे. तर प्रशासनाने घटनास्थळी तात्काळ धाव घेत वायूगळती थांबवली.सुचिता उथळे (वय ५०, रा. येतगाव, जि. सांगली) तर नीलम रेठरेकर (वय २६ रा. मसूर जि. सातारा) अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. सध्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अन्य पाच रुग्णांवरती आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
    ज्या वेगाने महत्त्वाचे उद्योजक, त्याच वेगाने वादग्रस्त; गौतम अदानींच्या वाढत्या लीला

    बोंबाळेवाडी एमआयडीसीमध्ये मॅनमार ही रासायनिक खते तयार करणारी कंपनी आहे. गुरुवारी सायंकाळी येथील गळतीमुळे विषारी वायू एमआयडीसी परिसर आणि शेजारच्या वस्तीवर पसरला. यामुळे श्वास घेताना अडचण, डोळ्यात जळजळ आणि उलट्या होऊन गंभीर त्रास होऊ लागल्याने कंपनीतील चार कामगार व परिसरातील सहा नागरिक अशा दहा जणांना कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत जवळच्या वस्तीवरील दोन महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य नऊजणांची प्रकृती चिंताजनक आहे. मृत महिलेचे नाव रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही.

    गळतीमुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांसोबतच परिसरातील नागरिकांनाही त्रास होऊ लागला. परिसरातील लोकांत घबराट पसरली आणि लोक जीव मुठीत घेऊन धावू लागले. घटनेची माहिती मिळताच माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, कडेगावचे तहसीलदार अजित शेलार आणि पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. गळती झालेला वायू कोणता होता, याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. यासंदर्भात तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला आहे. वायुगळतीमुळे बोंबाळेवाडी, रायगाव आणि शाळगाव परिसरातील नागरिकांना त्रास झाल्याचे समजते. नागरिकांनी दक्षतेचा उपाय म्हणून मास्कचा वापर केला.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed