Devendra Fadnavis On Voting Percentage Increased : राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. यंदाच्या विधानसभेला मतदानाचा आकडा वाढला असून याचा फायदा महायुतीला होणार असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. तसंच लाडकी बहीण योजनेवरही त्यांनी भाष्य केलं.
बुधवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ५८.२२ टक्के मतदान झाले होते. भारतीय निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की महाराष्ट्रातील २८८ विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ६५.११ टक्के मतदान झाले आहे, तर ७६.२५ टक्के मतदानासह कोल्हापूर जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. तर, मुंबई ५२.०७ टक्के मतदानासह सर्वात खालच्या स्थानावर आहे.
लाडक्या बहिणींच्या मतदानाचा टक्का वाढला, वाढलेल्या मतदानाचा फायदा कुणाला? पाहा आकडेवारी काय सांगते?
वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीबाबत उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रामध्ये मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे. आजपर्यंतचा इतिहास आहे की, जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढली आहे, तेव्हा तेव्हा भाजप आणि त्यांचा मित्रपक्षाला त्याचा फायदा होतो. त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की याचा आम्हाला नक्की फायदा होइल आणि महाराष्ट्रात आमचं सरकार येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
Nagpur News : नागपुरात गोंधळ, निवडणूक अधिकाऱ्यांवर अज्ञातांकडून तलवारी आणि चाकू हल्ला; ईव्हीएम लुटण्याचा प्रयत्न
महिलांची टक्केवारी वाढली
महिलांची मतदानाची टक्केवारी वाढली असल्याच्या बाबतीत फडणवीस म्हणाले की, प्राथमिक दृश्य दिसत आहे, मी २५-३० मतदारसंघात फोनवर संभाषण केले आहे, त्यात महिलांची मतदानाची टक्केवारी वाढली आहे. आम्ही बूथचे सर्टिफिकेट गोळा केले आहेत. तर त्यांच्या प्राथमिक माहितीनुसार महिलांची मतदानाची टक्केवारी वाढली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढली असावी हे नाकारता येत नाही, असंही ते म्हणाले.
अनिल देशमुखांवरील हल्ला म्हणजे सलीम-जावेदची स्टोरी; देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान
Nagpur News : मतदानाची टक्केवारी वाढली, फायदा भाजप-महायुतीला; फडणवीसांना विश्वास, म्हणाले, लाडकी बहीण योजनेमुळे….
विधानसभा निवडणूक मतदान संपल्यानंतर फडणवीस बुधवारी सायंकाळी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात पोहोचले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघ प्रमुख मोहन भागवत आणि माजी सरचिटणीस भैय्याजी जोशी महाल परिसरात असलेल्या संघ मुख्यालयात उपस्थित होते. फडणवीस १५ ते २० मिनिटे येथे थांबले. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी संघप्रमुख उभे असल्याची अटकळ बांधली जात आहे.