Ulhasnagar crime News : उल्हासनगरमध्ये ३ वर्षीय चिमुकलीचा अर्धवट जळलेल्या अवस्थेतील मृतदेह झाडा-झुडपांत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
एक महिला प्रेमनगर टेकडीवर तिच्या ३ मुलींसह राहते. १८ नोव्हेंबर रोजी ही महिला डॉक्टरकडे जात असताना तिची एक मुलगी बेपत्ता झाली होती. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिने याबाबत बेपत्ता प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. महिलेच्या तक्रारीनंतर हिललाईन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. तक्रार दाखल केल्यानंतर ३ दिवसांनी गुरुवारी २१ नोव्हेंबर रोजी प्रेमनगर टेकडीवरील झाडा-झुडपांच्या परिसरात एका मुलीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
रस्त्यावर शितपेय हातगाडी हात लावला आणि होत्याचं नव्हतं झालं, ६ वर्षीय चिमुकली डोळ्यासमोर… अंध वडील आणि आईचा हंबरडा
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठवला. या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी घाव घेत पाहणी केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आता जळालेल्या अवस्थेतील मृतदेह त्या चिमुकलीचा आहे का याचा तपास सुरू आहे.
Jhansi Hospital Fire : भीषण आगीतून ५ बाळांना वाचवलं, पण माझं बाळ अजून मिळालं नाही… हतबल वडिलांनी सांगितली सुन्न करणारी घटना
हा मृतदेह तीन वर्षीय बेपत्ता झालेल्या मुलीचा आहे का? चिमुकलीसोबत दुष्कृत्य करण्यात आलं का? की केवळ हत्या झाली आहे? या संपूर्ण घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलिसांकडून तपास सुरू असला, तरी डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतरच सर्व गोष्टी समोर येतील, अशी माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.
४ दिवसांपासून चिमुकली बेपत्ता, पोलिसांना झाडां-झुडपात भयंकर आढळलं; ३ वर्षीय चिमुकलीसोबत काय घडलं?
या घटनेनंतर या परिसरात ज्या आरोपीने चिमुकलीला अशाप्रकारे संपवलं, त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे. बेपत्ता झालेल्या मुलीच्या आईसह तेथील स्थानिकांनी हिललाईन पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातला. तर परिसरातील महिलांनी चिमुकलीला न्याय देण्याची मागणी करत या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त केला आहे.