Maharashtra Assembly Election 2024: शनिवारी (दि. २३) मतमोजणीनंतर त्यांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. जिल्ह्यात ११ मतदारसंघांमध्ये महाविकास आघाड़ी विरुद्ध महायुतीच्या उमेदवारांमध्ये प्रमुख लढती आहेत.
दरम्यान, रात्री उशिरापर्यंत शेवटची मतदान टक्केवारी मोजली जात होती. सायंकाळी काही केंद्रांवर मतदान सुरू होते. जळगाव जिल्ह्यातील ११ मतदारसंघांतील १३९ उमेदवारांचे भाग्य बुधवारी मतदान यंत्रात बंद झाले आहे. शनिवारी (दि. २३) मतमोजणीनंतर त्यांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. जिल्ह्यात ११ मतदारसंघांमध्ये महाविकास आघाड़ी विरुद्ध महायुतीच्या उमेदवारांमध्ये प्रमुख लढती आहेत.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात मतदान कर्तव्यावर असलेले लक्ष्मीकांत वासुदेव पाटील उपशिक्षक अनवर्देबुधगांव (वय ४९) हे मतदान (बीएलओ) कर्तव्यावरून त्यांच्या बभळाज ता. शिरपूर मूळगावी परत जात असताना मोटारसायकलचा अपघात झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. दृष्टिक्षेपात निवडणूक…. • मतदारसंघ – ११ ■ उमेदवार – १३९ पक्षीय उमेदवार- ३६ • मतदार ३६,७८,११२ मतदान कट – ३,६८३
महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ६३ टक्के मतदान; वेळ संपल्यानंतरही मतदारांच्या रांगा
नंदुरबार जिल्ह्यात सरासरी ७५ टक्के मतदान
धुळे : नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांतील एकूण १४३४ मतदान केंद्रांवर बुधवारी, सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरासरी ७५ टक्के मतदान झाले. नवापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ७४.६५, तर नंदुरबार विधानसभा मतदारसंघात सर्वांत कमी ५६ टक्के मतदान झाले आहे. चार विधानसभा मतदारसंघांत ३१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात नंदुरबार व शहादामध्ये दुहेरी, नवापूरमध्ये तिरंगी, तर अक्कलकुवामध्ये चौरंगी लढत होत आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून त्यांचे भवितव्य मतदार पेटीत बंद झाले आहे.
आधी मतदान, मग लग्न! मतदान केल्यानंतरच नवरी चढली बोहल्यावर, नागपूरच्या नेहाचं सर्वत्र कौतुक
धुळे जिल्ह्यात मतदारांचा उत्साह
धुळे : धुळे लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाकडून दाखवलेला मतदानाचा उत्साह यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही दिसून आला. शहरातील ८० फुटी रोडवरील ऍग्लो ऊर्दू हायस्कूल, शंभर फुटी रोडवरील हाजी साजदा बानो हायस्कूल, देवपूर परिसरातील एलएम सरदार उर्दू हायस्कूल, महापालिका शाळा क्र. चार, आठ, नऊ, पंचवीस यासह श्रीजी इंग्लिश मीडियम स्कूल, गरुड इंग्रजी स्कूल, कनोसा हायस्कूल, गिदोडिया हायस्कूल या ठिकाणी मुस्लिम महिला व पुरुषांची मतदानासाठी मोठी रांग सकाळपासूनच लागलेली दिसून आली.