• Wed. Nov 20th, 2024
    भाजपची हॅट्ट्रिक, शिंदेसेना ठाकरेंवर भारी, दादांना धक्का; एक्झिट पोल आला; बहुमत कोणाला?

    Maharashtra Election Exit Poll: आज राज्यात विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं. या मतदानानंतर विविध एजन्सीचे एक्झिट पोल येऊ लागले आहेत. चाणक्य स्ट्रॅटेजीसच्या सर्व्हेनुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येऊ शकतं.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: मागील ५ वर्षांत राज्यात अभूतपूर्व घडामोडी घडल्या. चित्रविचित्र आघाड्या, युत्या राज्यातील जनतेनं पाहिल्या. आपण मत कोणाला दिलं आणि ते नेमकं कुठे गेले, असा प्रश्न मतदारांना पडला. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज राज्यात विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं. या मतदानानंतर विविध एजन्सीचे एक्झिट पोल येऊ लागले आहेत. चाणक्य स्ट्रॅटेजीसच्या सर्व्हेनुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येऊ शकतं.

    चाणक्य स्ट्रॅटेजीसच्या सर्व्हेनुसार, महायुतीला १५२ ते १६० जागा मिळू शकतात. बहुमतासाठी १४५ चा जादुई आकडा गरजेचा आहे. तो महायुती पार करेल, असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. भाजप सलग तिसऱ्यांदा भाजप राज्यात विधानसभेत सगळ्यात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. सलग तिसऱ्यांदा भाजप ही किमया साधेल असा अंदाज आहे. चाणक्य स्ट्रॅटेजीसच्या सर्व्हेनुसार भाजपला ९० जागा मिळू शकतात.
    Maharashtra Election Exit Poll: भाजप सर्वात मोठा पक्ष, पण महायुतीला धक्का; राज्यात सत्तांतराचा अंदाज, एक्झिट पोलचे आकडे समोर
    भाजपसोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेला ४८ जागा, तर अजित पवारांना २२ जागा मिळू शकतात. याचा अर्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्यांच्या आमदारांचा आकडा कायम राखताना दिसत आहे. तर अजित पवारांना सर्वात मोठा धक्का बसताना दिसताना आहे. अजित पवारांसोबत ४० आमदारांनी शरद पवारांची साथ सोडली. काँग्रेसचे काही आमदारही नंतर त्यांच्यासोबत आले. पण अजित पवारांना मोठा धक्का बसेल असं सर्व्हे सांगतो.
    Karale Master: तो आला, एकही शब्द न बोलता थेट मारु लागला! कराळे मास्तरांवर हल्ला, भाजपवर आरोप
    दुसरीकडे महाविकास आघाडी १३० ते १३८ जागा जिंकून बहुमताच्या जवळ जाताना दिसत आहे. काँग्रेस मविआतील सगळ्यात मोठा पक्ष ठरू शकतो. त्यांना ६३ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर शिवसेना उबाठाला ३५, राष्ट्रवादी काँग्रेसला ४० जागा मिळू शकतात. ठाकरेंना शिंदेंच्या तुलनेत कमी यश पाहायला मिळेल असा अंदाज आहे. त्याचा फटका मविआला बसताना दिसत आहे.

    महायुतीत भाजपनं सर्वाधिक १४८, शिवसेनेनं ८१ आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं ५९ जागा लढवल्या आहेत. तर मविआमध्ये काँग्रेसनं १०१, शिवसेना उबाठानं ९५, तर राष्ट्रवादी शपला ८६ जागा मिळाल्या. राज्यात बसपनं २३७, तर एमआयएमनं १७ उमेदवार दिले होते.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed