Ajit Pawar: अजित पवार २०१९ मध्ये बारामतीमधून १ लाख ६५ हजार मतांच्या फरकानं विजयी झाले होते. पण आता लोकसभेला त्यांच्याच मतदारसंघात त्यांच्या पत्नी ४८ हजार मतांनी पिछाडीवर पडल्या.
अजित पवार २०१९ मध्ये बारामतीमधून १ लाख ६५ हजार मतांच्या फरकानं विजयी झाले होते. पण आता लोकसभेला त्यांच्याच मतदारसंघात त्यांच्या पत्नी ४८ हजार मतांनी पिछाडीवर पडल्या. यावर अजित पवारांनी भाष्य केलं. ‘प्रत्येक निवडणुकीत केवळ आकड्यांची लढाई नसते. मी तुम्हाला १९९९ चं उदाहरण सांगतो. त्यावेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकाचवेळी झाली होती. मतदार मतदान केंद्रात जायचा. त्यावेळी ईव्हीएम नव्हतं. मतदार आधी लोकसभेची मतपत्रिका घेत होता. मतदान करत होता. मग विधानसभेची मतपत्रिका घेऊन मतदान करत होता. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रानं अटल बिहारी वाजपेयींच्या पाठिशी राहत खासदार निवडून दिले आणि विधानसभेला भाजप, शिवसेनेच्या विरोधात कौल दिला होता,’ असा पॅटर्न पवारांनी सांगितला.
Ajit Pawar: त्यांची सही नसतेच! मोदींचं नाव घेत अजित पवारांनी शेलारांच्या आक्रमक पवित्र्यातील हवा काढली
‘१९९९ मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीला नाईलाजास्तव एकत्र येत राज्यात सरकार स्थापन करावं लागलं. तेव्हा आघाडी नव्हती. त्यावेळी भाजप, शिवसेना एकत्र लढली होती. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी लढली होती. १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादीची स्थापना झालेली होती आणि त्याच वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये निवडणुका लागल्या होत्या. त्यामुळे लोक विधानसभा म्हटलं की वेगळा विचार करतात आणि लोकसभेला वेगळा विचार करतात,’ असं अजित पवार म्हणाले.
Supriya Sule: आजच VIDEO आला ताई! सुळेंच्या भाषणावेळी महिला अचानक बोलली न् बारामतीतील मंदिरांचा विषय चर्चेत
१९९९ मध्ये काय घडलेलं?
२४ वर्षांपूर्वी राज्यात एकाचवेळी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकी झाल्या. त्यावेळी राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता होती. या निवडणुकीत मतदारांनी युतीला धक्का दिला. शिवसेनेच्या ६९, तर भाजपच्या ५६ जागा निवडून आल्या. तर काँग्रेसला ८०, राष्ट्रवादीला ५८ जागा मिळाल्या. विधानसभा निवडणुकीत युतीला नाकारणाऱ्या मतदारांनी त्याचवेळी लोकसभेत युतीला साथ दिली. शिवसेनेच्या १५, तर भाजपच्या १३ जागा निवडून आल्या. दोघांचे प्रत्येकी ९ जागा अधिकच्या निवडून आल्या. तर काँग्रेस ३३ वरुन थेट १० वर घसरली. राष्ट्रवादीला ६ जागांवर यश मिळालं होतं.