Supriya Sule: सुप्रिया सुळेंनी बारामतीमधील त्यांच्या भाषणात मतदारसंघातील अचानक गायब झालेल्या मंदिरांचा विषय उपस्थित केला. युगेंद्र पवार यांच्यासाठी सुळेंचं भाषण आयोजित करण्यात आलं होतं.
सुप्रिया सुळेंनी त्यांच्या भाषणात बारामती मतदारसंघातील अचानक गायब झालेल्या मंदिरांचा विषय उपस्थित केला. ‘भिगवण चौकात गेलं की बावरायला होतं. तो भुलभुलय्या चौक आहे. तिकडे वाहनं अंगावर येतात. पण आता तिथला प्रश्न सुटणार आहे. मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी बोलले आहे. वारजे पुलाचा प्रश्न आपण सोडवला. आता दोन-तीन महिन्यांत भिगवण चौकाचा प्रश्न सुटेल आणि मग तिथले अपघात थांबतील’, असं सुळेंनी सांगितलं.
Supriya Sule: सभा सुरु असताना चिठ्ठी आली, सुळेंनी भाषण थांबवलं; मजकूर वाचताच शोधाशोध सुरु अन् मग…
‘मी अंधश्रद्धाळू नाही. पण माझी श्रद्धा आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच माझ्यासोबत घडलेला एक किस्सा तुम्हाला सांगते. मी भिगवण चौकातून कारनं जात होते. एका महिलेनं मला थांबवलं. इकडे जास्त अपघात का होतात, माहित्येय का, असा प्रश्न तिनं केला. मी म्हटलं, डिझाईन चुकलंय. तो फॉल्ट आहे. तर ती महिला म्हणाली, डिझाईन चुकलं आहेच. पण आणखी एक गोष्ट आहे. इथे आधी मंदिरं होती. ती आता नाहीत, ही बाब तिनं लक्षात आणून दिली’, असा किस्सा सुळेंनी सांगितला.
‘भिगवण चौकात कोपऱ्यावर आमराईचं घर आहे. तिथे रणजीत पवार आणि शुभांगी वहिनी राहतात. आमच्या कुटुंबाच्या त्या घरात आम्ही अनेक वर्षे वास्तव्यास होतो. तिकडे कोपऱ्यावर शंकराचं, दत्ताचं मंदिर होतं. मला भेटलेली महिला सांगत होती, आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही मंदिरात गेलो, पूजा केली. दुसऱ्या दिवशी गेलो, मंदिरं नव्हती. कोणी पाडली ती मंदिरं?’ असा सवाल सुळेंनी विचारला.
Sharad Pawar: काहींना प्रश्न पडलाय, आता मी काय करायचं? शरद पवारांचं दादांना उत्तर, पण ‘ते’ शब्द टाळले
सुळे किस्सा सांगत असताना एक महिला बोलू लागली. ताई तो व्हिडीओ आजच आला मला, असं त्या महिलेनं म्हटलं. त्यांचे उद्गार ऐकून सुप्रिया सुळे चपापल्या. कोणता व्हिडीओ आता तुम्हाला? अशी विचारणा सुळेंनी केली. त्यावर ती मंदिरं पाडली ना. शंकराचं, दत्ताचं, नवग्रहाचं मंदिर होतं. ती मंदिरं पाडल्याचा व्हिडीओ आजच माझ्या मोबाईलवर मी पाहिला, असं महिलेनं सांगितलं. त्यावर मंदिरं कोणी पाडली मला माहीत नाही. पण ती पाडली गेली, हे तर सत्य आहे, असं सुळे म्हणाल्या.