Maharashtra Election 2024: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ, सावंतवाडी व कणकवली येथे सभा झाल्या. या सभेतून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली.
आमचे मिंधे म्हणतात, वाऱ्यामुळे पुतळा पडला, तुमची दाढी नाही पडली का? अशी जहरी टीका ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांवर केली. भाजप आमचा मित्र पण यांनी दगा दिला. बाळासाहेबांनी युती केली नसती तर भाजप नसती अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. मी हिंदुत्व सोडणार नाही, मी काँग्रेस बरोबर गेलो सगळे मित्रपक्ष माझ्यासोबत आहेत. कारण आम्ही तुमची हुकूमशाही काढायला एकत्र आलो आहोत. आम्हाला हुकूमशाही नको तर शिवशाही पाहिजे आणि म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत. आम्हाला दडपशाही घालवायची आहे, अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी कोकणातील सभांमधून केली आहे. बुधवारी १३ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ, सावंतवाडी व कणकवली या तीन ठिकाणी ठाकरे यांनी सभा घेतल्या. सावंतवाडी येथून राजन तेली, कणकवली येथून संदेश पारकर तर कुडाळ मालवण मधून आमदार वैभव नाईक यांच्यासाठी ठाकरे यांनी या तीन सभा घेत यांना निवडण्याचा आणण्याच आवाहन केले.
बारामतीत प्रतिभा पवार अजितदादांच्या विरोधात का प्रचार करत आहेत? स्वत: शरद पवारांनी दिले उत्तर
तुम्ही नामर्द म्हणून यंत्रणांचा वापर
तुम्हाला शिवसेना संपवायचे आहे ना करा प्रयत्न तुमच्याकडे सगळ्या यंत्रणा न घेता मर्द असाल तर समोर येऊन लढा असे थेट आव्हान देत मर्द नसल तर तुम्ही तर मग सगळे तुमचे ईडी, इन्कम टॅक्स सीबीआय वाले वापरता याचा अर्थ तुम्ही मर्द नाही आहात, अशी जहरी टीका ठाकरे यांनी कोकणातील सभेत केली आहे. नामर्द आहात, तुम्ही सरकारी यंत्रणांचा तुम्ही दुरुपयोग करता, असाही गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. माझ्या लोकांना धमक्या देता जुन्या केसेस उकरून काढता आणि त्यांची फोडाफोडी करता पैसे देताय तू सुद्धा माझ्या जनतेच्या खाल्लेला या भाषेत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. आणि या नामर्दशी मला लढावं लागतं याच्यासारखं मला दुसरे दुर्दैव वाटत नाही.
370 कलम हटवल्याबद्दल कौतुकच पण…
370 कलम तुम्ही हटवलं त्यावेळी अमित शहाजी शिवसेनेने तुम्हाला पूर्ण पाठिंबा दिला होता. हे कलम काढल्याबद्दल तुमचं कौतुक मी तेव्हाही केलं होतं आणि आजही करतो. ते कलम देशासाठी काश्मीरसाठी महत्त्वाचे आहेत काश्मीर हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे आणि हे आम्हाला मान्यच आहे. पण 370 कलम काढला ते लोकसभेसाठी ठीक आहे. पण तुम्ही कोकणात येऊन त्याचं कौतुक काय सांगता, असे शब्द ठाकरे यांनी सुनावला आहे.
अजित पवारांविरुद्ध उमेदवार का दिला? स्वत:च्या पक्षाचे किती आमदार निवडून येतील? शरद पवारांनी थेट संख्याच सांगितली
पुतळा पडल्याचा सूड उगवा, यांना एकही मत देऊ नका
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले, वैभव तू केलास अरे पण मग आपण याचा सूड घेणार आहोत की नाही. की नुसतेच फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय असे बोलणार. पुतळा पडला याचा जर आपण सूड घेणार नसू तर मग आपण जयजयकार करण्याचे लायकीचे नाही आहोत. ज्या भ्रष्ट हाताने अशुभ हाताने तो छत्रपतींचा पुतळा उभारला आणि त्यामध्ये ज्यांनी पैसा खाल्ला त्या भाजपाच्या आणि मिंधेच्या उमेदवाराला एकही मत या पवित्र कोकण भूमीतून पडता कामा नये, असा हल्लाबोल ठाकरे यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की,माझं हेलिकॉप्टर काल औसाला होतं व पंतप्रधान काल सोलापूरला होते. मला सांगितलं गेलं की त्यांचं हेलिकॉप्टर उडत नाही, तोपर्यंत तुमचा उडणार नाही. हा संदर्भ देत पंतप्रधान म्हणून जर का रुबाब दाखवायचा असेल तर पंतप्रधानांसारखे वागा. मी अडीच वर्षाच्या काळात मुख्यमंत्री असताना शपथ घेतली होती कारण ती घटनेची शपथ होती. मी कधीही कोणावरही भेदभाव केला नाही. कोणीही सांगावं आणि जो कायदा मला लागतो तोच कायदा पंतप्रधान यांनाही लागतो, अशी टीका करत कोणत्याही एका पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराला देशाचा पंतप्रधान येता कामा नये हा सुद्धा आता कायदा करायला हवा अशी भूमिका ठाकरे यांनी कुडाळ येथील सभेत मांडली. तुमची भाड्याने माणसं आणलेली जशी जमतात तशी माझ्यासाठी जीवाभावाची माणसं थांबतात अशा शब्दात ठाकरे यांनी हेलिकॉप्टर उड्डाणाचा संदर्भ देत सुनावले आहे.
आयात निर्यात धोरणावर टीका
मी मराठवाड्यात फिरलो विदर्भात फिरलो शेतकरी संतापले आहेत कारण सोयाबीनला, कापसाला, डाळीला भाव मिळत नाही शेतकरी तुमच्याकडे आशेने बघतात पण तुमचे आयात निर्यात धोरण तुम्ही अशी काही आता की आता कांद्याचे भाव वही पडले आहेत अशी टीका ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केली आहे.
ज्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी येऊन स्वतःच्या देखरेखी खाली सिंधुदुर्ग किल्ल्याच्या रूपाने आपल्याला एक वैभव उभा करून दिलं चारशे वर्षे झाली त्यावेळी ची आक्रमण झाली पण ऊन वारा पाऊस लाटांचे तडाखे अनेक वादळे झेलत तरीसुद्धा सिंधुदुर्ग किल्ला ताठ मानेने उभा राहिला कारण महाराजांच्या पवित्र स्पर्शाने तो पावन झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पडलेल्या पुतळ्यावरून त्यांनी मोदी सरकार व शिंदे सरकारवर बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दाढीवरही त्यांनी टीका केली.
आमच्या सभांना मोठी गर्दी होतेय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मशाली पेटल्या आहेत. वैभव नाईक बद्दल अभिमान, तू लाचार झाला नाही असे सांगत त्यांनी दिपक केसरकर व राणे यांच्यावर जोरदार टीका केली. राजन तेली सुद्धा आले उपरकर आता परत आले सगळी जुनी शिवसेना परत आली आहे आणि यांनी मला धमकी दिलीय. आडवा आल्यास आडवे करू तेवढी ताकद हिम्मत शिवसेनेत आहेच असेही प्रति आव्हान उद्धव ठाकरे राणे यांच्या बालेकिल्लात दिले आहे. कोकणचे वैभव जपायचे की नाही हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो? का पुन्हा तुम्हाला गुंडा फुंडांचे राज्य पाहिजे ? आठवा असं सांगत श्रीधर नाईक, गोवेकर, भिसे ही प्रकरणे गुंडशाहीची आहेत या सगळ्याची उजळणी करत ठाकरे यांनी कोकणवासियांना भावनिक साद घातली. या सगळ्या दडपशाहीला वैभव त्यांना एकटा नडला होता असं सांगत ठाकरे यांनी वैभव नाईक यांच्या कौतुक केले.