Rohit pawar on Ajit Pawar : राज्यात पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी भाजपसोबत हातमिळवणी करणार होती, यासंदर्भातील बैठत उद्योगपती अदाणींच्या घरात शरद पवार आणि अमित शहा यांच्यात झाल्याचा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला. यावर रोहित पवारांनी आपली प्रतिक्रिया देताना अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
माझी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला विनंती आहे की अदानींना थेट विचारा की काय घडलं ते मग आपल्याला दूध का दूध पाणी का पाणी काय ते कळेल. आपल्या हातातून निवडणूक जात आहे आणि कोणताही पर्याय नसतो तेव्हा खोटं बोलावं लागतं. खोटे बोलून आपले उमेदवार निवडून यावे असा हा केविलवाना प्रयत्न असावा तो प्रयत्न अजित पवार करताना पाहायला मिळत असल्याचं म्हणत रोहित पवार यांनी दादांवर निशाणा साधला. यावेळीबोलताना रोहित पवांरांनी बॅग तपासणीबाबतही पवारांनी भाष्य केलं.
या अगोदर सत्तेत असणाऱ्या लोकांच्या बॅगा तपासल्या गेल्या नाहीत. उद्धव ठाकरे यांची बॅग तपासल्यावर त्यांनी सांगितले की तपासणी करायची असेल तर दोघांचीही करा नाहीतर दोघांची करू नका. लोकं पेटून उठल्यावर आता सत्तेतील लोकांच्या बॅगा निवडणूक आयोग तपासायला लागलाय. ज्या लोकांनी बॅक तपासली त्यांना अभिनंदन पत्र निवडणूक आयोगाने दिला ही चांगली गोष्ट आहे. पण बॅग न चेक करणाऱ्या वर काय कारवाई केली ते पत्र समोर यायला हवं, असं रोहित पवार म्हणाले. महाराष्ट्र पोलीस असताना मध्यप्रदेश पोलिसांना बॅग तपासणी करण्यासाठी कशाला आणता? लोकांना दाखवण्यासाठी का होईना मात्र सत्तेतील लोकांची बॅग तपासणी होत आहे ही चांगली गोष्ट असल्याचं बोलत पवारांनी सत्ताधाऱ्यांनी कोपरखळी लगावली.
देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात दहशत- रोहित पवार
महाविकास आघाडीचे स्ट्राईक रेट चांगला आहे, जवळपास १७० जागा निवडून येणार, विदर्भात सर्वाधिक चांगलं स्ट्राईक रेट विदर्भात असेल. लोक नाराज आहे काही ठिकाणी दहशतीचे वातावरण आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात दहशत आहे त्यामुळे लोक समोरून बोलत नाही काही लोक बोलून दाखवत नाही तर करून दाखवत असतात, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.